ब्रेकिंग न्यूज
शालेय विद्यार्थी सह विद्यार्थिनी ची फरफड पैठण तहसिल कार्यालया कडून दिडदोन महिन्या पासुन उत्पन्न दाखला रहिवासी दाखला मिळेना :! ————-पैठण प्रतिनिधी दै. महाराष्ट्र लोक न्यूज ———————-रामनाथगोर्डे ———– पैठण: पैठण तहसिल चा कारभार एवढा मनमानी झाला कि कोणी कोणावर वचक राहिला दिसत नाही कारण पैठणसह ग्रामिण भागातील तालुक्यांतील शालेय महाविध्यालयीन मुले-मुली यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी तहसिल कार्यालयात दाखल केलेले उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल दाखला रहिवासी दाखला जातींचा दाखला मिळण्यासाठी दिडदोन महिन्या पासुन दाखल केले तहसिल कार्यालयात कोण कोणाचा वरीष्ठ अधिकारी हे समजणे अवघड झाल्यामुळे शालेय विद्यार्थी. शाम शिंदे ओमकार शिंदे स्नेहाशिंदे या विद्यार्थीनींना.दाखल केलेले उत्पन्न रहिवासी नॉन क्रिमिनल दाखला मिळेना अशी प्रतिक्रिया प्रतिनिधी जवळ व्यक्त केली————–उत्पन्न रहिवासी दाखला मिळेना———– पैठण तहसिल चा कारभार रामभरोसे मनमानी चालतो शालेय विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक चकरा मारुन वैतागले —————–दै महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी —————————-रामनाथ गोर्डे ——————— पैठण ; पैठण तहसिल मध्यें शालेय महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थीनींना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्या साठी व शेतकरी जेष्ठ नागरिकांना भुमीहीन दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल नवीन शिधापत्रिका साठी शासकिय श्रावणबाळ निवृती वेतन सेवा योजना लाभ मिळेल त्यासाठी लागणारे उत्पन्न रहिवासी दाखला भुमीहीन दाखला जातींचा दाखला आपल्या मुलगा मुलींना लागणारे कागदपत्र.पुढील वर्गात प्रवेश महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी असे इतर कागदपत्र देण्याचे बंधनकारक आहे.पैठणसह ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना सर्व स्थरातील होतकरू लाभार्थी व ग्रामिण भागातील शेतकरी मजूर यांनी दोनतीन महिन्या पासुन उत्पन्न जातीचं रहिवासी भूमिहीन नॉनक्रिमिनल दाखला असे तीन महिन्या पासुन दाखल केले शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींना प्रिन्सिपॉल व मुख्याध्यापक यांनी आपण उत्पन्न रहिवासी जातींचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला लवकर जमा करा नसता आपला शालेय महाविद्यालयीन प्रवेश नाकारला जाणार अशी मुले मुलींना तंबी दिली पैठण तहसिल कार्यालयात सर्वच विभागातील काम रामभरोसे झाले तेथील काही हित चिंतकांचे कामे एक दिवसात होतात शाम नामदेव शिंदे मी उत्पन्न दाखला रहिवासी दाखला २५/७/२०२४ रोजी दाखल केले मी ओमकार बाबासाहेब थोरे १५/७/२०२४ स्नेहा शामशिंदे नानासाहेबखराद यांनी दोन महिन्यां पासुन दररोज आम्ही चकरा मारीत आहे अधिकारी उडवाउडवीची ची उतर देतात अशी भावना व्यक्त केलीचिंचोली सांगळे तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री विजय ओंकार सांगळे यांची बिनविरोध निवड. लोणार तालुका ग्रामीण प्रतिनिधी रघुनाथ आघाव. बुलढाणा/लोणार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली सांगळे येथे तंटामुक्ती अध्यक्ष पद निवडीसाठी ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर पंजाबराव घुगे होते.सर्वप्रथम अध्यक्षांच्या परवानगीने तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा ठराव मांडण्यात आला.या पदासाठी माजी सरपंच श्री विजय ओंकार सांगळे यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसभा अध्यक्षांनी श्री विजय ओंकार सांगळे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होत असल्याचे जाहीर केले.तर उपाध्यक्ष पदी किसनराव अर्जुन सांगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.श्री विजय ओंकार सांगळे हे चिंचोली सांगळे येथील माजी सरपंच असुन त्यांची गाव न्यायाधीश म्हणून ख्याती आहे.त्यांचा अनुभवाचा गावाला चांगला फायदा होईल अशी उपस्थिता मध्ये चर्चा होती.या ग्रामसभेला सरपंच डॉक्टर पंजाबराव घुगे उपसरपंच दसरथ कांबळे ग्रामसेवक खरात साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य श्रीमान साहेबराव पाईकराव सर पंढरी बळीराम सांगळे शिवानंद सांगळे रामेश्वर सांगळे अभिमन्यू सांगळे राजू सांगळे संतोष सांगळे दिनकर कांबळे संजय सांगळे सोपान केदार रमेश सांगळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायत व गावकरी मंडळींनी अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.येवती येथील हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा. लोणार तालुका ग्रामीण प्रतिनिधी रघुनाथ आघाव. बुलढाणा/लोणार 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून देशात साजरा केला जातो.त्या अनुषंगाने सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येवती तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.सकाळच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्वयं शासन प्रशासन अर्थात विद्यार्थी आजच्या दिवसासाठी शिक्षकांच्या भूमिकेत होते.यामध्ये कुमारी ऋतुजा पवार दत्ता सानप कुमारी पल्लवी मोरे कुमारी पुजा मोरे ऋषिकेश डोंगरे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.त्यानंतर दुपारच्या सत्रात शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बि.एस.नागरे सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री थोरवे सर व राऊत सर होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री डोंगरे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री गीते यांनी केले होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री बी.एस.नागरे सरांनी उपस्थितांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.*दि ५.९.२०२४ रोजी संघर्ष योध्दा यांच्या समर्थनासाठी तहसिल कार्यालय येथे निदर्शन आंदोलन* … दि.२४ ऑगस्ट पासून चालू असलेले शेतकरी व कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू आसलेले राजनगाव फाटा शे.पु. येथील संघर्ष योध्दा अजय पाटील साळुंके यांचे उपोषण 11 दिवसांनंतर जिल्हा अधिकारी,कृषी अधिक्षक छ.सभाजीनगर, उप कामगार आयुक्त, यांच्या लेखी आश्वासनाने शेतकरी व कामगार यांच्या विनतीने तात्पुरत्या स्वरूपात माघे घेण्यात आले सविस्तर असे की दि 24 ऑगस्ट शेतकरी व कामगार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालू असलेले आमरण उपोषण आचनक दि २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ते ८:३०वा पोलीस उपोषण स्थळी दाखल झाले व उपोषण कर्ते अजय पाटील साळुंके यांना पोलीसांनी ताब्यात घेत घाटी रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिस स्टेशन वाळुज MIDC येथे नेण्यात आले पण घाटी रुग्णालयात देखील अजय पाटील यांनी कुठलाही वैद्यकीय उपचार घेणार नाही जो पर्यंत माझे सहकारी यांना सोडत नाही तसेच शेतकरी व कामगार यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत शेवटी शासन व प्रशासन नमले व त्यांच्या सहकाऱ्यांना सोडले आणि जिल्हा अधिकारी यांनी उपोषणाची दखल घेतली व सर्वांना पत्र पाठवून दिले व अजय पाटील यांना सर्व कार्यालयांचे लेखी आश्वासन दिले व जिल्हा अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले पण अजय पाटील यांनी हट्ट धरला की ज्या पोलिसांनी मला या ठिकाणी आनले व मी ज्या ठिकाणी उपोषणाला बसलो त्या ठिकाणी मला घेऊन चला व आमचे मंडप व इतर साहित्य जप्त केले आहे ते जो पर्यंत परत भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही शेवटीं शासन व प्रशासन नमले व सर्व अजय पाटील यांच्या म्हणल्याप्रमाणे झाले व लेखी आश्वासन घेऊन तात्पुरत्या स्वरूपात उपोषण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून उपोषण सोडले व आता ते पुढील उपचारासाठी डॉ डोंगरे साहेब यांच्या हॉस्पिटल पुढील उपचारासाठी दाखल झाले आहे पण *आज दि ५.९ गुरुवार रोजी सकाळी ११वा तहसिल कार्यालय वैजापूर येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले कारण की त्यांच्यावर व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे माघे घ्यावे व त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करावी व ज्यांनी उपोषणादरम्यान दाखल केलेले गुन्हे माघे घेण्यात यावे अन्यथा अजय पाटील समर्थक व शेतकरी आणि कामगार आंदोलन, उपोषण करतील याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सद्या अजय पाटील यांच्यावर डॉक्टर डोंगरे साहेब यांच्या डोंगरे हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत*हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी साठ हजार रुपये सरसकट अनुदान द्या पान कनेरगाव प्रतिनिधी शिवराज आरे हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे पीक होत्याचे नव्हते झाली मायबाप शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची गरज आहे तरी सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही पंचनामे न करता सरसगड हेक्टरी 60 हजार रुपये अनुदान द्यावे व पिक कर्ज माफ करावे सरकारने आता लाडकी बहीण योजना काढली आहे तरी आता लाडका शेतकरी ही योजना सुद्धा काढावी व शेतकऱ्यांना भरभरून मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सरकारने जर अशी नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष हिंगोली गजू भाऊ देशमुख पूर्ण हिंगोली तीव्र आंदोलन करणार असे पत्रकार सोबत बोलताना त्यांनी सांगितले आहे जय महाराष्ट्रमज्जिती मध्ये घुसून मारण्याची धमकी प्रकरणी नितेश राणे विरुद्ध गुन्हा दाखल करावा —— जाफराबाद शहर काँग्रेस कमिटी =============== (दत्ता देशमुख यांच्याकडून ) जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देऊन, नितेश राणे विरुद्ध गुन्हा दाखल करावा. एक सप्टेंबर 2024 रोजी नितेश राणी आणि आपल्या भाषणांमध्ये मुस्लिम समाजाला मज्जिद्दीमध्ये घुसून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून ज्या प्रभात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आशयाचे वक्तव्य केल्यामुळे नितेश राणे विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी विनंती या निवेदनात केलेली आहे. निवेदनावर शेख मज्जित शेख इस्माईल, मेहबूब पठाण, रियाज पठाण, मेहबूब शेख, सलीम मलिक, अहमद पठाण, शेख मुजीब, शेख रियाज भाई, सलमान खान, जहीरयारखान, शेख इस्माईलंउद्दीन, सलमान कुरेशी,बिस्मिल्ला शहा, शेख अजीज, जुबेर खान, शाहिद खान, करीम कुरेशी, शाहरुख शहा, आदी लोकांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक इंगळे यांना देण्यात आली.नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व जे बी के विद्यालय शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार =============== (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमती जेबीके विद्यालयांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक दिन शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल्यामुळे सर्व शिक्षक भावनिक झाले. याप्रसंगी संस्थेचे शेख जमीर सर यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शेख जमीर सर यांनी सांगितले शिक्षकाचे ध्येय हे विद्यार्थी घडवणे असून समाजातील लोकांमध्ये प्रतिमा चांगली निर्माण करणे हा उद्देश असतो त्यामुळे शिक्षकांची भूमिका आणि आजच्या काळातील आव्हान यामध्ये शिक्षकच हा महत्त्वाचा दुवा असून शिक्षकांच्या हातून अनेक सामाजिक कार्य घडवून येऊ शकतात.याप्रसंगी उपस्थित त्यामध्ये संस्थेच्या वतीने ज्येष्ठ संचालक मधुकरराव निकम, माजी सचिव तथा संचालक प्रेमसुख काबरा,ज्येष्ठ संचालक विश्वनाथराव सांगोळे, तथा उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, यांची आवर्जून उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांची प्राध्यापकांशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संवाद साधण्यात आला व त्यांना शिक्षक दिनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. प्राचार्य नंदकुमार काळे, उपमुख्याध्यापक पंजाब सोळंके, पर्यवेक्षक धनंजय पुराने, सखाराम बोरकर,रमेश इंगळे, विष्णू जाधव, संजीव कुलकर्णी गणेश सावसक्के, प्राध्यापक सुनील बनसोडे प्राध्यापक अरुण आहेर, प्राध्यापक केजी जाधव, प्राध्यापक रामदास भांगे, प्रा गजानन धोटे, प्राध्यापक डॉक्टर आनंद जाधव, राजेंद्र जगताप कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, रवींद्र मोरे, संजय कुलकर्णी, समाधान कांबळे, वासुदेव क्षीरसागर, दत्ता उखर्डे, भिवसन ससाने, राजू डोमळे, श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती आवटी मॅडम, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती भिलावेकर मॅडम, श्रीमती कळंबे मॅडम, श्रीमती लंबे मॅडम, नागोराव देशमुख, दगडोबा तांबेकर, दीपक देशमुख, तसेच संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक तसेच उपप्राचार्य झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा! राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे जाहिर आवाहन! (दत्ता देशमुख याज कडून ) प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच ईद मिलादुन्नबी निमित्त हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे सलग ११व्या वर्षी देखील उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे.यात फक्त उर्दू शिक्षक-शिक्षिका सहभाग घेऊ शकतात. यात विजेत्या शिक्षक-शिक्षिकांना रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षिस, प्रमाणपत्र तसेच शानदार स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल. उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांना निबंध स्पर्धेतील खालील विषयावरच निबंध लिहायचा आहे… विषय– *”सिरत मुस्तफा ﷺ और हमारी बेटियां”* या विषयांवरच १००० ते १२०० शब्दात (4 ते 5 पेज )लिहून आपला नाव, शाळेचा नाव लिहून या पत्त्यावर पाठवायचं आहे. “विनस फूट वेअर, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, सिल्लोड पिन कोड 431112.” टीप- निबंध हे लिहून पोस्टानेच पाठवायचे आहेत. आपले निबंध बंद पाकिटात पोस्टाने 21 सप्टेंबर (शनिवार) 2024च्या आत पोहचतील असे पाठवावे. याची सर्वानी नोंद घ्यावी. तसेच हँड टू हँड प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत फक्त पोस्टाने आलेले निबंधच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत… महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक बंधू-भगिनिंसाठी दर वर्षी प्रमाणे सलग ११व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे राज्य स्तरीय व जिल्हास्तरीय मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शिक्षक-शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपले आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी केली आहे. राज्य स्तरावर मराठी माध्यमातुन ३ आदर्श शिक्षक पुरस्कार, उर्दू माध्यमातून ३ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय मराठी मध्ये मनपा-१ , खाजगी-१ , जिल्हा परिषद-१ असे ३ आणि उर्दू माध्यम मध्ये जिल्हा परिषद-१ , खाजगी-१ , मनपातुन एक एक शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ चित्रकला शिक्षक आणि उर्दू माध्यमातून चित्रकला शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ क्रीडा शिक्षक व उर्दू माध्यमातून १ क्रीडा शिक्षक असे एकूण १६ शिक्षक-शिक्षिकांची आदर्श शिक्षक पुरुस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे, तरी महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आपले प्रस्ताव 21 सप्टेंबर (शनिवार) 2024 पर्यंत पाठवावे. सर्व शिक्षक-शिक्षिकांनी काही अडचण किंवा शंका असल्यास तर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर 9657524545 यांच्याशी संपर्क साधून आपला आपला प्रस्ताव सादर करावे असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.*तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड* (दत्ता देशमुख याज कडून ) कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 28 संघानी सहभाग नोंदविला होता, मुलांमध्ये वयोगट 14 या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली असून वयोगट 14 मुलींचा कबड्डी संघ उप विजेता ठरल्यामुळे तालुका क्रीडा समन्वयक प्राध्यापक वाहेद पटेल व क्रीडा शिक्षक मोहन मुनेमाणिक, समाधान सूरवसे व विजेत्या संघांचे संस्थेचे अध्यक्ष मा. दिनकरराव देशमुख यांनी प्रोत्साहन देऊन अभिनंदन केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक समाधान दुनगहू, ज्येष्ठ शिक्षक बालू धनवई,व संतोष कोल्हे, संभाजी एंडोले, विजय काठोळे, एजाज बेग, गणेश आंधळे, विजय मघाडे, संगीता विधाते, माया पोटे, प्रल्हाद खारतुडे, सुधाकर वाघमोडे, सुभाष जाधव, पंजाबराव देशमुख, बालाजी जोशी यांनी क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे अभिनंदन व्यक्त केले.

Translate »
error: Content is protected !!