आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या समता पुरस्काराचे वितरण आज फुले वाडा, समता भूमी, पुणे येथे पार पडले पुणे जिल्हा उपसंपादक अभिजित सिध्दार्थ चव्हाण प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्री. नागराज मंजुळे यांना रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधत महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, लढा दिला. त्यांना देखील मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याची गरज असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करत राहिले पाहिजे. जे लोक आपल्यासाठी लढत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महात्मा फुले समता भूमी ही आपल्यासाठी शक्ती केंद्र असून आपली वैचारिक शक्ती वाढविण्यासाठी आपण या शक्ती केंद्राला भेट देत असतो, असे विचार यावेळी मांडले. नागराज मंजुळे हे ज्याप्रमाणे आपल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचप्रमाणे काम करणारे आमचा एक योद्धा हरी नरके हे होते ते आज आपल्यात नाही त्यांची मोठी उणीव आपल्याला जाणवते. त्यांनी फुले दाम्पत्याच्या सर्व साहित्याचे संशोधन करून ते सर्व साहित्य मुख्य प्रवाहात आणले. अनेक विरोध खोडून काढत सत्य समाजासमोर त्यांनी आणले. त्यांचे योगदान देखील अतिशय महत्वाचे असल्याच्या भावना मांडल्या. यावेळी अभिनेते नागराज मंजुळे यांनी देखील माझ्या दिशाहीन जीवनात महात्मा फुले यांच्या विचारांनी मला मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आपण आज इथपर्यंत येऊ शकलो. महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडले. आपले जगणे आणि हक्क समजण्यासाठी महात्मा फुलेंचे चरित्र वाचले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मानपत्राचे वाचन प्रा. गौतम बेंगाळे यांनी केले. या सोहळ्याच्या प्रारंभी पुण्याचे माजी महापौर उल्हास नाना ढोले पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार पंकज भुजबळ, आमदार हेमंत रासणे, माजी खासदार समीर भुजबळ, मुस्लीम ओबीसी संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, डॉ.शेफाली भुजबळ, माजी महापौर वैशाली बनकर, उपाध्यक्ष दिलीप खैरे, मनोज घोडके, अॅड.मंगेश ससाणे,अॅड.मृणाल ढोले पाटील, मनीषा लडकत, सदानंद मंडलिक, प्रा.गौतम बेंगाळे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर,महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव, डॉ.नागेश गवळी यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माजी अधिक्ष राजू घाटोळे, सूरज देवकर व पदाधिकारी कार्यकर्ते व समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या समता पुरस्काराचे वितरण आज

Read more

बिडकिन पोलीस ठाणे हद्दीतील लांखेगांव येथे दुर्दवी घटना विहीरीत पडलेल्या भावजयीला वाचविण्यासाठी औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांचा मृत्यू दै,महाराष्ट्र लोक न्यूज नेटवर्क पैठण प्रतिनिधी रामनाथ गोर्डे पैठण,: पैठण तालुक्यातील बालानगर महसुल मडांळातील बिडकिन पोलीसठाणे हद्दीतील मौजे लांखेगांव येथील गावा जवळील सरकारी विहीरीत पाणी काढतांना तोल जाऊन केंद्रीय औधोगिक सुरक्षा जवानांचा भाऊ राहुल छगनकच्छे यांची पत्नी सौ सगिंतालाराहुल कच्छे (वय ३२) हिस वाचविण्यासाठी दिल्ली येथील केंद्रीय औधोगिक सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या कांहीं दिवसांपुर्वी सुट्टी्वर आलेला दिर करणछगनकच्छे वय (२७) यांनी विहीरीत उडी मारली असतांना करण छगन कच्छे यांच्यां डोक्याला विहीरीचा कोपरा लागल्याने जागीच मृत्युं झाल्याची घटना २८ नोंहे दुपारी २,३० वाजता लांखेगांव येथे घडली मात्र भावजयीचा जीव वाचला याबाबत बिडकिन पोलीसठाणे यांना खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन विहीरीतुन करण छगन यांना बाहेर काढुन बिडकिन येथील शासकिय ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ उस्माशेख यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले सदर घटनेची नोंद करण्यात आली याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक माने व सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे करित आहे

बिडकिन पोलीस ठाणे हद्दीतील लांखेगांव येथे दुर्दवी घटना विहीरीत पडलेल्या भावजयीला वाचविण्यासाठी औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांचा मृत्यू दै,महाराष्ट्र लोक न्यूज

Read more

भंडारा-गोंदिया बसचा भीषण अपघात….. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता… २९ नोव्हेंबर २०२४ भंडारा / खेमराज शरणागत विषेश उपसंपादक महाराष्ट्र लोक न्युज चॅनल भंडारा जिल्हा. भंडारा वरुन सडक/अर्जुनी मार्गे गोंदियाला जात असलेल्या शिवशाही बस क्र.MH- ०९ EM -१२७३ या शिवशाही बसचा अपघात घडल्याची घटना आज २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आसुन. सदर बसचा अपघात डव्वा परिसरात खजरी गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात ७ ते ८ च्या वर लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. तसेच दहा ते पंधरा नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.निश्चित आकडा अजून पुढे आला नाही.सदर घटनास्थळी पोलिस व स्थानीक प्रशासन पोहचले असुन जखमी प्रवाशीयांना प्राथमीक उपचाराकरीता गोंदिया च्या दवाखाण्यात हलविण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास गोंदिया पोलीस करत आहेत.

भंडारा-गोंदिया बसचा भीषण अपघात….. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता… २९ नोव्हेंबर २०२४ भंडारा / खेमराज शरणागत विषेश उपसंपादक महाराष्ट्र लोक न्युज

Read more

डोंगरला गावात भटक्या कुत्र्याची दहशत,कुत्र्याने घेतला चार इसमांना चावा खेमराज शरणागत/तुमसर तुमसर तालुक्यातील मौजे डोंगरला गावात भटक्या कुत्र्याने चार इसमाला चावा घेतल्याने गावात सगळीकडेच भीतीचे वातावरण पसरले आहे.काल दि.२८ नोव्हेंबर रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने काही इसमांना चावा घेतला .उमाशंकर देवदास मुकुरणे वय ४५ वर्षे,रामदास फागोजी बनकर वय ५८ वर्षे,कार्तिक रामचंद्र शेंडे वय ३६ वर्षे,इंदुबाई कोल्हटकर वय ५६ वर्षे,असे फिर्यादीचे नाव आहेत.हे सर्व २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ -०० ते ०१-०० वाजेच्या सुमारास गावात आप आपले दैनंदिन काम करत होते. या सुमारास गावात कुत्रा पिसाळल्यामुळे लोकांना चावा घेऊ लागला.

डोंगरला गावात भटक्या कुत्र्याची दहशत,कुत्र्याने घेतला चार इसमांना चावा खेमराज शरणागत/तुमसर तुमसर तालुक्यातील मौजे डोंगरला गावात भटक्या कुत्र्याने चार इसमाला

Read more

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निवास्थानी जाऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार माहोरा (प्रतिनिधी) जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील भाजपाचे तिन्ही गटाने माजी केंन्द्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, विद्यमान आमदार संतोष पा. दानवे,यांचे भोकरदन येथे पिता,पुत्राचा पुष्प गुच्छ स्वागत अभिनंदन व सत्कार माहोरा येथील जेष्ठ नेते भगवानराव पा. लहाने, डॉ.रविंन्द्र पा.कासोद,डॉ. कैलासराव देशमुख, या भाजपाच्या तिन्ही गटाने अभिनंदन, स्वागत, सत्कार केला आहे.या ज्येष्ठ नेते वामनराव पा.लहाने,अनिल देशमुख लहाने,तुकाराम पोफळे,कोडुबा बोरसे, गणेश पोपळ घट, सुखदेव साबळे,बाबुराव साबळे,गजानन सोनुने,शेख शकिल ड्रायवर,बाळासाहेब गव्हले,सोनु क्षिरसागर, भास्करराव अवकाळे, सैय्यद सलिम भाई,शेख अजिम,सैय्यद अफसर,जेष्ठ वामनराव पा.लहाने,प्रकाश म्हस्के,संतोष गौरकर,संतोष वरपे, जंम्मा पठाण, आ आदानी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निवास्थानी जाऊन पुष्प गुच्छ देऊन सत्कार माहोरा (प्रतिनिधी) जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील भाजपाचे तिन्ही गटाने

Read more

माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालय सविधान दिना निमित्याने मध्ये भारतिय घटनेच्या उद्देसिका प्रतचे वाचन, माहोरा > न्युज २६ नोव्हेंबर जाफ्राबाद तालुक्यांल माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालय मध्ये भारतिय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतिय देशात लिहिली घटना प्रतीचे १९४९ भारता ला समर्पित केले. व भारतिय कायदा १९५० ला कायदयाची आमलबजावनी सुरू झाली. अश्या महामानवास माहोरा येथील ग्रामसंसद मध्ये प्रतिनेचे पुजन व भारतिय घटनेच्या उद्देसिकेच्या वाचन माहोरा येथील सरपंच गजानन पाटील लहाने, लझ्मण वाघ, विकास जाधव, गणेश गायकवाड, विजय इंगळे, गुलाब कळम, केरुबा साबळे, अन्य ग्रामस्थाच्या उपस्थित सविधानाचे वाचन केले. सर्व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते.

माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालय सविधान दिना निमित्याने मध्ये भारतिय घटनेच्या उद्देसिका प्रतचे वाचन, माहोरा > न्युज २६ नोव्हेंबर जाफ्राबाद तालुक्यांल

Read more

माहोरा (प्रतिनिधी )२८ नोव्हेंबर जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे बालविवाह प्रतिबंधक कायदया बद्दल माहिती शाळेतील विद्यार्थ्याना जिल्हा परिषद प्रा.शा.चे मु. अ. श्रीकृष्ण चेके, जेष्ठ शिक्षक सुधिर लकडे, गणेशराव पवार, दिलीप सपकाळ, ए.डी.पवार, अन्य शिक्षकांनी व अंगणवाडी सेविका, अश्या सेविका,यांनी सुध्दा बालविवाह कायदा बद्दल समाजात जनजागृती करावी व कोठेही २१ वर्षाच्या मुली विवाह बाल विवाह होणार नाही यांची जागृत पालकांनी जागृत राहुन बालविवाहस रोखण्यास कायदने व समाज ने सहकार्य करावे व बालविवाह होण्यास टाळावे असेही श्रीकृष्ण चेके यांनी मार्गदर्शन पर बोलतांना सांगितले.

माहोरा (प्रतिनिधी )२८ नोव्हेंबर जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे बालविवाह प्रतिबंधक कायदया बद्दल माहिती शाळेतील विद्यार्थ्याना जिल्हा

Read more

हजरत टिपू सुलतान रहेमतुल्ला आलेह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न…. हदगांव नांदेड (प्रतिनिधी बालाजी गणपतराव गायकवाड )दि. 25रोजी हदगाव तालुक्यातील तामसा शहरांमध्ये हजरत टिपू सुलतान रहेमतुल्ला आलेह जयंती निमित्ताणे राक्तदान शिबिराचे आयोजन दि. 25रोजी करण्यात आले MIAMI पक्ष हदगांव तालुक्याच्या वतीने तामसा शहरातील कार्यकर्त्यांनी तामसा येथे आयोजन केले होते. या महा शिबिरामध्ये रक्तदान 53 जनाने रक्तदान केले. या कार्यक्रमाला उपस्थित तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती कमल शिंदे,वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष जेकीनराज राजभाऊ रावळे, जुनेज पठाण,माजी ग्रामपंचायत सदस्य जिया बागवान, जयश्री राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हजरत टिपू सुलतान रहेमतुल्ला आलेह यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न…. हदगांव नांदेड (प्रतिनिधी बालाजी गणपतराव गायकवाड )दि. 25रोजी हदगाव

Read more

दुःख बाजूला ठेवून, लोकशाहीच्या उत्सवात टेंभुर्णीच्या देशमुख कुटुंबियांनी केले मतदान (दत्ता देशमुख यांच्याकडू)नलोकशाहीत मतदानाला किती महत्त्व आहे याचा प्रत्यय बुधवारी टेंभुर्णीकरांना आला. पत्नीच्या अंत्यविधीनंतर पतीसह परिवार जणांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला. येथील माजी पंचायत समिती सदस्य दिनकरराव देशमुख यांच्या पत्नी मनकर्णाबाई देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधी मतदानाच्या दिवशी बुधवारी दुपारी ठेवण्यात आला होता. दरम्यान, ४ वाजता अंत्यविधी झाल्यानंतर काही वेळातच मतदान केंद्रावर जाऊन त्यांचे पती दिनकरराव देशमुख व परिवार जणातील इतर सदस्यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. पत्नीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून या परिवाराने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकटीसाठी हातभार लावल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. पत्नी निधनाचे दुःख जरूर आहे. मात्र, लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आमच्या परिवार जणांनी काही वेळ हे दुःख बाजूला सारून मतदानासाठी पुढाकार घेतला, अशा भावना यावेळी दिनकरराव देशमुख यांनी व्यक्त केल्या.

दुःख बाजूला ठेवून, लोकशाहीच्या उत्सवात टेंभुर्णीच्या देशमुख कुटुंबियांनी केले मतदान (दत्ता देशमुख यांच्याकडू)नलोकशाहीत मतदानाला किती महत्त्व आहे याचा प्रत्यय बुधवारी

Read more

रौप्य महोत्सव होणार साजरा.आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज यांच्या समाधी सोहळा निमित्त विविध कार्यक्रम. भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ. (दत्ता देशमुख यांजकडून )टेंभुर्णी येथे आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी व संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा निमित्त टेंभुर्णी येथे भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील खलसे गुरुजी यांच्या मळ्यातील गणपती व रंगनाथ महाराज मंदिर परिसरात आयोजित या सप्ताहाचा शुभारंभ गुरुवारपासून करण्यात आला आहे. या सप्ताहात दररोज काकडा भजन, गणपती व रंगनाथ महाराज पूजन- आरती, विष्णुसहस्त्रनाम, रंगनाथ महाराज चरित्र पठण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा, प्रवचन, हरिपाठ व हरिकीर्तन याप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथेचे वाचन अशोक महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतून केले जाणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळात होणाऱ्या हरिकीर्तनात सुभाष महाराज शेळके, विठ्ठल महाराज जगताप, श्रीपाद बुवा मुळे महाराज, प्रकाश महाराज तौर, भगवान महाराज गाडेकर, सदानंद महाराज क्षिरसागर, रामदास महाराज तळेकर आदिंची कीर्तन सेवा होणार आहे. सप्ताहाची सांगता २८ नोव्हेंबर रोजी रघुनाथ महाराज देशपांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे यावेळी सायंकाळी ४ ते ७ या वेळात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. टेंभुर्णीसह पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीतर्फे करण्यात आले आहे.यंदा रौप्य महोत्सव म्हणजे या कार्यक्रमाचे २५ वे वर्ष असल्यामुळे भक्तीमय चे मस्त कार्यक्रम पार पडणार आहे.

रौप्य महोत्सव होणार साजरा.आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज यांच्या समाधी सोहळा निमित्त विविध कार्यक्रम. भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ.

Read more
Translate »
error: Content is protected !!