बालानगरची स्वाती भावले महाराष्ट्र किशोरी खो-खो कर्णधार पदी निवड सर्वत्र कौतुक दै,महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी रामनाथ गोर्डे पैठण : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धांसाठी किशोरी-किशोरी अस्मिता खेलो इंडिंया महिला लिंग स्पर्धा साठी किशोरी गट असे तीन संघ महाराष्ट्र खो-खो असोशियन सरचिटणीस प्रा,चंद्रकांत जाधव यांनी धाराशिव येथे जाहीर केले छ, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर श्री,सरस्वती भुवन प्रशाला ची विध्यार्थीनी वैष्णवी भावले हिची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी किशोरी किशोरी खेलो इंडिया महिला स्पर्धा कर्णधार पदी निवड झाली बडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग स्पर्धा साठी संघांच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली हे संघ निवडण्यासाठी धाराशिव जिल्हा खो-खो स्पर्धा संघटनेच्या वतीने मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर झाली १८ संप्टे २०२४ पासुन मुंबई अस्मिता खेलो इंडिया महिला लिंग किशोरी गट नेतृत्व वैष्णवीभावले छ ,संभाजीनगर ( कर्णधार ) करणार ऋतुजा सुरवसे कीर्ती काटे (सोलापूर) आरोहीपाटील (धाराशिव) कार्तिक कारणे (सांगली) आरती घाटे (पुणे) गौरी रोडे निधी जाधव (ठाणे) प्राजल जाधव दिशा बोंद्रे (सातारा) निलम मोहडकर वैष्णवी फुटक (रत्नागिरी ) रोहीणी गावित (नंदुरबार) वैष्णवी मदन (जालना) राणी भालेराव (परभणी) प्रशिक्षक महेंद्रकुमारगाढवे (सातारा) नंदिनी धुमाळ (मुंबई)अमोलमुटकुळे (हिंगोली) राजाराम शितोळे (सोलापूर) वर्षाकछवा (बिड) विशाल पाटील (जळगाव) अदि निवड समिती सदस्य हजर होती

बालानगरची स्वाती भावले महाराष्ट्र किशोरी खो-खो कर्णधार पदी निवड सर्वत्र कौतुक दै,महाराष्ट्र लोक न्यूज पैठण प्रतिनिधी रामनाथ गोर्डे पैठण :

Read more

*सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन व नदी स्वच्छता अभियान संपन्न* (दत्ता देशमुख याकडून )-जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने 17 व 18 सप्टेंबर 2024 रोजी *ग्रीन क्लब *व * राष्ट्रीय सेवा योजना* विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जाफराबाद येथे, गणपती विसर्जना निमित्त निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा उद्देश जे निर्माल्य पाण्यामध्ये विसर्जित केल्या जाते त्यामुळे जल प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. तो टाळण्याकरिता महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियानांतर्गत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने रेपाळा रोड येथील गणपती विसर्जनाच्या ठिकाणी जाऊन महाविद्यालयातील युवकांनी निर्माल्य संकलित केले तसेच या निर्माल्याचे संकलन केल्यानंतर जैविक खत तयार करण्यासाठी या निर्माल्याचा महाविद्यालयीन परिसरातील झाडांसाठी सेंद्रिय खत म्हणूनवापर करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 18 सप्टेंबर 2024 वार बुधवार रोजी ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकां मार्फत नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने जाफराबाद शहराची जीवनदायिनी पूर्णानदी येथे स्वयंसेवकांनी नदी पात्रामधील निर्माल्य, प्लास्टिक बॅग व इत्यादी प्लास्टिक साहित्य नदीपात्रातून काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. या अभियानासाठी प्राचार्य डॉ. र . तु. देशमुख उपप्राचार्य विनोद हिवराळे तसेच ग्रीन क्लबचे प्रमुख प्रा. मनीष बनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. संजय साळवे, डॉ. निलेश भोसले भोसले, डॉ. डी. टी. तांगडे, डॉ. मोहरी एस. पी. डॉ. संतोष पहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्वयंसेवक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

*सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन व नदी स्वच्छता अभियान संपन्न* (दत्ता देशमुख याकडून )-जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने 17 व

Read more

तालुका प्रतिनिधी कैलास भोसले जि. प. प्रा. शाळा माहेरजवळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन मोठ्या उत्साहात साजरा* आज शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश सरोदे व सरपंच श्री सुधाकर अण्णा भोसले यांनी सरदार वल्लभभाई पटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झेंडावंदन केले. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना विषयी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले विचार भाषणाद्वारे मांडले. त्यापूर्वी शाळेसाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिल्याबद्दल पाणी प्रश्न कायमचा मिटवल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री कैलासभाऊ भोसले यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री मळभागे सरांनी सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर ग्रामपंचायत कार्यालयामार्फत शाळेसाठी टेबल, खुर्च्या आणि भौतिक सुविधा पुरविल्याबद्दल सरपंच श्री सुधाकर अण्णा भोसले साहेब, उपसरपंच श्री संजय पवार साहेब आणि ग्रामसेवक श्री जमादार साहेब यांचा सुद्धा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री बोचकरी सर यांनी केले तर प्रास्ताविक मळभागे सरांनी व आभार प्रदर्शन श्री कुलदीपके सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री पवार सर, श्रीमती संकाये मॅडम, श्री गुंगाणे सर, श्री दारेबोईनवाड सर यांनी मेहनत घेतली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

तालुका प्रतिनिधी कैलास भोसले जि. प. प्रा. शाळा माहेरजवळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन मोठ्या उत्साहात साजरा* आज शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम

Read more

*गुंजखेड येथील ग्रामस्थांनी गणरायाला एकत्रित आरती घेऊन गणपती बाप्पा ला निरोप दिला !* *लोणार तालुका प्रतिनिधी समाधान सरपाते* गूंजखेड ग्रामस्थांनी एक गाव एक गणपती अशी मोहीम राबवली होती आज गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व गावातील प्रतष्ठित मंडळी एकत्र येऊन दिला गणरायाला निरोप यावेळी प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच उपसपंच तसेच गावातील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दाटला कंठ जरी निरोप देतो तुला हर्षाने.. माहित आहे आम्हाला देवा पुन्हा येणार तू एका वर्षाने……

*गुंजखेड येथील ग्रामस्थांनी गणरायाला एकत्रित आरती घेऊन गणपती बाप्पा ला निरोप दिला !* *लोणार तालुका प्रतिनिधी समाधान सरपाते* गूंजखेड ग्रामस्थांनी

Read more

इद ए मिलाद च्या निमित्ताने युथ मुवमेंट आँफ महाराष्ट्र च्या वतिने रक्तदान शिबिर 103तरुणानी केले रक्तदान तब्बल आठ वर्षापासून शेकडो युवक करताहेत रक्तदान (दत्ता देशमुख याज कडून ) जाफ्राबाद येथे युथ मुवमेंट आँफ महाराष्ट्र जाफ्राबाद च्या वतिने आज इद ए मिलाद च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामधे 103 युवकांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले यावर्षीही पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांच्या उपस्थितित शिबिराचे उदघाटन करण्यात आले सविस्तर व्रत्त असे की जाफ्राबाद येथील यूथ मुवमेंट आँफ जाफ्राबाद तर्फे तब्बल आठ वर्षापासुन इद ए मिलाद च्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे व याला तरुनांतर्फे उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे स्वामी समर्थ ब्लड बँक जालना हे रक्त संकलन करत आहे ज्यामधे प्रकाश भांगे ,डाँ राजेंद्र सुर्यनारायण ,बिपिनकुमार मगरे ,धनराज राठोड ,ओमकार क्षीरसागर ,हरिऄोम क्षीरसागर,पुजा कांबले ,रहिम सय्यद आदी जण उपस्थित होते तसेच युथ मुवमेंट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आतापर्यत आठ वर्षापासुन तब्बल 1200 ते 1500 युवकांनी रक्तदान केले इद ए मिलाद म्हणजे उर्दु तिथिनुसार रब्बिउल अव्वल ची 12 तारीख ज्यादिवशी इस्लाम चे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला व याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला पवित्र कुरान मधिल एका आयतित सांगितल्याप्रमाने ज्या कोणी व्यक्तिने एका मानसाचा जिव वाचवला त्याने संपुर्ण मानवजातिचा जिव वाचवला त्या अनुषंगाने मानुसकी जपण्याकरिता मानसांनी मानसांच्या भल्यासाठी कार्य करित राहावे असे मोहम्मद पैगंबर आपल्या अनुयायांना नेहमी सांगत विशेष म्हणजे जगभर हा दिवस मुस्लीम बांधव मोठ्या आनंद आणी उत्साहाने साजरा करतात त्याचप्रमाने जाफ्राबाद येथील युथ मूवमेंट ऑफ जाफराबाद चा वतिने रक्तदानाचा आदर्श असा उपक्रम राबिवला जात आहे ज्यामधे शेकडो तरुण रक्तदान करत आहे

इद ए मिलाद च्या निमित्ताने युथ मुवमेंट आँफ महाराष्ट्र च्या वतिने रक्तदान शिबिर 103तरुणानी केले रक्तदान तब्बल आठ वर्षापासून शेकडो

Read more

*राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा* (दत्ता देशमुख याज कडून ) स्थानिक जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल ,स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तदनंतर सुयश भैय्या संजयजी लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष सुयश भैय्या लहाने हे होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य संजय फलटणकर प्राचार्य पंजाब लहाने प्राचार्य गजानन वायाळ प्राचार्य पठाण सर सर्व शिक्षक शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक विनोद उबरहंडे, अमोल तेलंग्रे, नवाज शेख, दत्तात्रय गाडेकर, विमल एस, भागवत लहाने, विनोद धवलीया, वनिता बोडखे, रोहिणी सोळुंके, वैष्णवी पिंपळे, सविता बकाल, स्नेहल रिंढे, सुनीता मोरे, अश्विनी दुनगहु, विमल मदन, प्रभाकर रोकडे, केशव पंडितकर, बाळू चव्हाण, अंकुश जोशी इत्यादींची उपस्थिती होती.

*राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा* (दत्ता देशमुख याज कडून ) स्थानिक जिजाऊ इंग्लिश स्कूल

Read more

संजीवनी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल टेम्भूर्णी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस उत्साहात साजरा (दत्ता देशमुख व्याज कडून ) टेम्भूर्णी ता जाफ्राबाद येथील संजीवनी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा डोमाळे मॅडम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपमुख्याध्यापीका सौ भाग्यश्री जाधव मॅडम होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन श्री सांडू महाराज उखर्डे, श्री महादू भाऊ धारे, सौ पुजा जाधव सौ प्रतिक्षा उखर्डे, सौ अश्विनी उखर्डे, सौ ललिता बाई उखर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.ध्वज पुजन सौ पुजा जाधव यांनी केले तर ध्वजारोहण श्री सांडू महाराज उखर्डे यांनी केले. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकाणी आपल्या प्राणाचे बलिदान दिले असे मत प्रमुख मार्गदर्शिका सौ भाग्यशी जाधव यांनी मांडले तर अध्यक्षीय समारोप करताना विध्यार्थ्यांनी महान क्रांतिकरनाचे विचार आत्मसाद करावे असे प्रतिपादन वर्षा डोमाळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिला जाधव मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली पंडित मॅडम,दिक्षा चंदनशिवे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वात शेवटी खाऊ ( चॉकलेट ) वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

संजीवनी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल टेम्भूर्णी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस उत्साहात साजरा (दत्ता देशमुख व्याज कडून ) टेम्भूर्णी ता जाफ्राबाद

Read more

सुयश फार्मसी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा जाफराबाद प्रतिनिधी – आकाश बकाल जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. येथील जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था संचलित, सुयश फार्मसी महाविद्यालयात 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १३ महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. वरुड चे सरपंच विलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार हे होते. सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक रवींद्र मापारी, स्वप्नील भराड, योगेश काटकर, विठ्ठल गावडे, प्रभाकर गिरणारे, हर्षल लहाने, प्रकाश चवरे, आकाश बकाल, भागवत कराडे, प्राजक्ता भेंडाळे, किरण वायभट, ज्योती ठाकरे, गंगुबाई राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सुयश फार्मसी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा जाफराबाद प्रतिनिधी – आकाश बकाल जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. येथील जिजामाता

Read more

*विश्वरत्न शांती दुत हजरत मोंहम्मद पैगंबर जयंती निमित्त व गणेशोत्सव निमित्ताने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* फाऊंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान अन्नछत्र मंडळात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम प्रसिद्ध विधीतज्ञ अॅड अलीम पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे करमाळा तालुका प्रतिनिधी फेरोज खान जिल्हा सोलापूर यावेळी सकल मुस्लीम समाज करमाळा चे अध्यक्ष जमीर सय्यद आझाद शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रमजान बेग (सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन,) सुरज शेख (सचिव रहनुमा ट्रस्ट),सोहेल पठाण( राष्ट्रवादी युवक अध्यक्ष) दिशान कबीर, जहाँगीर बेग, आलिम पठाण,शाहीद बेग,इकबाल शेख ,कलंदर शेख, फिरोज बेग, आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुफरान शेख, कलीम शेख, आरीफ पठाण,इरफान सय्यद, अय्यूब मदारी,कय्युम मदारी, अरबाज शेख उपस्थित होते.

*विश्वरत्न शांती दुत हजरत मोंहम्मद पैगंबर जयंती निमित्त व गणेशोत्सव निमित्ताने भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* फाऊंडेशन व

Read more

*आंबेडकर चौक बाबुपेठ येथे दोन हायमास्ट लाईट देण्याची आम आदमी पार्टी युथ विंग ची मागणी* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारोती कोडापे चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गांवर आंबेडकर चौक येथे अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासंदर्भात जनतेची तक्रार आम आदमी पार्टी युवा आघाडी कडे कडे येत आहे. या ठिकाणी दोन डिवायडर मध्ये मोठे अंतर असल्याने स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले नाही. याठिकाणी ये- जा करणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात असून आंबेडकर येथून सिद्धार्थ नगर कडे जाणाऱ्या वळणावर एक तर, गाडगेबाबा चौक कडून आंबेडकर नगर मध्ये जाणाऱ्या वळणावर एक असे दोन (२) हायमास्ट लाईट लावण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांनी मनपा आयुक्त यांना केले असून यावर लवकरच कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याला दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे, यावेळेला निवेदन देतांना आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसुम शेख, जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, अयुब शेख, नजमा बेग इत्यादी उपस्थित होते.

*आंबेडकर चौक बाबुपेठ येथे दोन हायमास्ट लाईट देण्याची आम आदमी पार्टी युथ विंग ची मागणी* चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारोती कोडापे

Read more
Translate »
error: Content is protected !!