निषेध रॅली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारुती कोडापे जाहीर आव्हान बुडती हे जन… जाहीर आव्हान ना देखवे डोळा.. म्हनूनी कळवळा येत असे…… डोंगरदऱ्यात, अतिशय दुर्गम भागात पिचत पडलेल्या समाजाला पेनचे (शिक्षणाचे महत्व) समजून देणे हा गुन्हा आहे काय ? तळागाळातील लोकांना संविधान साक्षर करणे हा गुन्हा आहे काय? डोंगरदऱ्यात इतरत्र भटकत्या समाजाला सामाजिक सलोखा म्हणून एकत्र आणणे व त्यांच्यात आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक गरजाविषयी जागृती निर्माण करणे हा गुन्हा आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व उच्चशिक्षित होऊन आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे सारख्या समाजभान ठेवून निद्रावस्थेत असलेल्या समाजाला आपल्या कृतीने जागे करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय का? ज्या समाजाच्या नावावर आम्ही दोन घास खायला लागलो, त्या समाजाच्या व्यथा समजून त्यांना वैचारिक मदत करू शकत नसेल तर आम्ही चार पुस्तके शिकण्याला अर्थ काय ? पुस्तक वाचल्याने माणसाचे मस्तक सशक्त होते, सशक्त मस्तक कोणाचे हस्तक बनत नाही, व कोणासमोर नतमस्तकही होत नाही. कोरोनासारख्या जागतिक महामारीत आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योद्धयाची उत्कृष्ठ भूमिका निभावणारा व कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करताना घरातील एक डॉक्टर देशाला अर्पण करणारा व्यक्ती आज वाईट कसा? सूर्याला आपला स्वतःचा परिचय द्यायची गरजच नाही. सूर्याचा प्रकाशच त्याचा आपोआप परिचय देतो. डॉ. प्रवीण येरमे यांच्या सेवेची दखल घेऊन एकेकाळी आपल्याच व्यवस्थेने त्यांना कोरपना भूषण पुरस्कार देऊन पाठ थोपटली होती मग तो व्यक्ती आज वाईट कसा? इमाने इतबारे आपले शासकीय कर्तव्य पूर्ण करून उर्वरित वेळेत स्वखर्चातून प्रचंड बजेट असणारे मिशन ग्रॅज्युएट, मिशन पोस्ट ग्रॅज्युएट, मिशन पी.एच.डी., संविधान जागृती, संविधानाच्या १००० प्रतीचे मोफत वितरण, समाजव्यवस्था व संस्कृती टिकवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गाव पाटलाचा सन्मान, गावपाडे, तांडे, गुडे यावर जाऊन आरोग्य विषयक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती, गरोदर माता जनजागृती, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, नवजात बालकांच्या जन्माचे स्वागत म्हणून बोधिवृक्ष (पिंपळ वृक्ष) तसेच वडाचे वृक्ष देऊन मातांचे स्वागत असे अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गरिबाचा मार्गदर्शक म्हणून पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे यांच्या सामाजिक कार्याला शेवटी दृष्ट लागलीच. हा समाज सुधारला तर आमच्या सतरंज्या कोण उचलणार? ही नीच प्रवृत्तीची मानसिकता असणारी राजकीय शक्ती व त्या राजकीय शक्तीला रसद पुरविण्यारे समाजातील काही दलाल सक्रिय झाले व मागील एक वर्षापासून समाजसेवा, समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाच्या लढाईत काटे फैलविण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे रुग्णालयातील सहकारी, रुग्णालयातील शासकीय कर्मचारी, उपचार घेणारे रुग्ण किंवा इतरत्र विभागीय चौकशी नसताना रातोरात अचानक ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे बदली झाल्याचा आदेश धडकतो. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पहिलेच अनेक पदे रिक्त असताना व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आधीच पाच डॉक्टर कार्यरत असताना या ठिकाणी बदलीने अतिरिक्त डॉक्टर देण्याची गरज काय ? नक्कीच यामागे खूप मोठे राजकीय कटकारस्थान आहे. विकृत मानसिकतेची प्रवृत्ती कार्यरत आहे हे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारचे ठोस कारण नसताना गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे यांना हाकलण्याचे कारण काय ? बदलीसाठी कोणाचा राजकीय दबाव होता? राजकीय ताकद वापरून प्रशासनावर दबाव आणणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? आपल्या बहुजन स समाजाने सारे दिवस यांच्या सतरंज्या उचलाव्या हे दिपास्वप्न पाहणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? यांचा जाब विचारण्यासाठी तळागाळातील बहुजन जनतेने होणाऱ्या निषेध रॅलीत प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे. * स्थळ : गडचांदूर ता. कोरपना जिल्हा : चंद्रपूर * दिनांक : ५ सप्टेंबर २०२४ गुरुवार वेळ : दुपारी १२.०० वाजता भव्य निषेध रॅलीचा मार्ग क्रांतिकारी बाबुराव शेडमाके चौक ते संविधान चौक ते जननायक बिरसा मुंडा चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सभेत रूपांतर व निवेदन देणे. * आपले विनीत आयोजक समस्त बहुजन समाज राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती

निषेध रॅली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारुती कोडापे जाहीर आव्हान बुडती हे जन… जाहीर आव्हान ना देखवे डोळा.. म्हनूनी कळवळा येत

Read more

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल

Mharastralok News ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. कृपया आपली न्यूज खालील स्वरूपात शेअर करा. १. जिल्हा २. न्यूज हेडलाईन ३. न्यूज

Read more

परभणी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला परभणी जिल्हा प्रतिनिधी. आयुब आतार परभणी सईद खान यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत सोनपेठ परभणी ग्रामीणच्या ज्येष्ठ व प्रमुख 200 पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सईद भैया खान यांच्या नेतृत्वात 20 जून रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला येथील सर्व कार्यकर्त्यांनी सईद भैया खान यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला ना मंत्रीपद, ना आमदारकी, ना खासदारकी, तरी विकासाची असंच न्यारी, अल्पवधीतच विकासाची अनेक प्रश्न, कामे मार्गी लावणारे व विकासाची धमक असणारे आणि सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या मोठमोठ्या आजारावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून पेशंटला मदत करण्याचं काम तो कोणत्याही जातीचा असेल तरी त्यांच्या अडीअडचणीला मदत करणारा एकमेव नेता सईद भैया खान आहे म्हणून तो सर्वांच्या मनात राहतो त्यामुळे सईद भैया यांना प्रत्येक कार्यकर्ता माझा आहे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणार एकमेव नेता सईद भैय्या खान आहे म्हणून सर्व कार्यकर्ते त्यांना मानत आहे त्याना मनातलं कुशल नेतृत्व सईद भैया खान यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी विधानसभा अंतर्गत येणाऱ्या परभणी तालुक्यातील अनेक गावातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये परवेशाचा ओघ हा कायम असून निश्चितच येत्या काळात पाथरी विधानसभेत परभणीत यावेळी बदल घडून सर्वसामान्यना विकासाच्या माध्यमातून न्याय देणार असल्याची गवाही यावेळी दिली या प्रवेश सोहळ्याला माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, दादासाहेब दादा टेंगसे, जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, चक्रधर उगले, सर्जेराव गिराम, पप्पू भैया घांडगे, संतोष गलबे, आसिफ खान, इसोफोदिन अन्सारी , विठ्ठल रासवे, एल आर कदम, खालेद शेख , युनुस कुरेशी, अन्वर अन्सारी, राज्यातील सर्व अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक शिवसैनिक, कार्यकर्ते यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह सईद भैया खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला

परभणी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला परभणी जिल्हा प्रतिनिधी.

Read more

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब कार्यकारी उपसंपादक मधुकर भुजंग साहेब मराठवाडा विभागीय उपसंपादक योगेश पाटील निकम साहेब महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल परिवाराकडून बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी निवड रमेश लांडगे जिल्हा विशेष प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन💐💐💐💐

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब कार्यकारी उपसंपादक मधुकर भुजंग साहेब मराठवाडा विभागीय उपसंपादक योगेश पाटील निकम

Read more

टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी महाराष्ट्र लोक न्यूज चैनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून) राजमाताजिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्राम ससंद येथे अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच गौतम म्हस्के उपसरपंच संतोष पाचे ग्रामसेवक जगदीश आढाव ग्रामससंद सदस्य पांडुरंग बोरसे सर्जिराव कुमकर भिकन पठाण प्रमोद उखर्डे दत्ता सोनसाळे रविंद्र फैसल चाऊस रामकिसन सोनसाळे उखर्डे गणेश गाडेकर गजानन अंधारे कर्मचारी विक्रम उकांडे अजिस भाई दिगंबर भिसे सुनिल भाले बाबासाहेब जमधडे रामदास धनवाई बाबु साबळे योगेश गायमुखे अनिल गायकवाड माने मामा शिवाजी भिडे सपाटे साहेब संतोष भागवत

टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालयात मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी महाराष्ट्र लोक न्यूज चैनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून)

Read more

अल्पावधीत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला —— सौ निर्मलाताई दानवे ——-================ महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन संपन्न झाला. माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी स्वामी विवेकानंद पतसंस्था स्थापन झाली. या पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या सुविद्या पत्नी सौ निर्मलाताई दानवे, यांनी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या कार्याबद्दल, गौरवोद्गार काढताना सांगितले की स्वामी विवेकानंद पतसंस्थेने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन केला. चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे, तसेच लोकांशी संवाद साधण्याची कला अस्तित्वात असल्यामुळे हा विश्वास संपादन करता आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मुकुंदा आवटी यांनी संस्थेचा लेखाजोखा म्हणून प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम पाटील म्हस्के यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई म्हस्के, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शोभाताई मतकर, आशाताई माळी, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, टेंभुर्णीच्या सरपंच सुमनताई मस्के यांचे प्रतिनिधी गौतम दादा मस्के, यांची आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी संवाद साधताना पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व टेंभुर्णीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पीजी तांबेकर, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे प्रभात तालुका अध्यक्ष शेख अशपाक, संजय राऊत नसीम शेख, शेख साबिर, प्रल्हाद जाधव, बालाजी शेवाळे, बिडी सवडे, गजानन शेळके, अल्केश सोमानी, कामाच्या व्यस्ततेमुळे भेट देऊन गेलेले प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची जालना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, आदींचा यथोचित. सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये चेअरमन मुकुंद आवटी, व्हाईस चेअरमन शिवहरी मुळे, संस्थेच्या सचिव रेवती आवटी,प्रसिद्ध चित्रकार तथा संचालक संतोष आवटी, ज्येष्ठ संचालक गुलाबराव शिंदे, डॉक्टर अविनाश सुरवसे, रुस्तुम राव बोर्डे, अल्केश सोमानी, बद्री शेठ अग्रवाल, गजानन शेळके काशिनाथ गायमुखे, मंगेश वाणी, संचालिका जयश्री आवटी, सरला आवटी तसेच संस्थेचे कर्मचारी तथा वसुली अधिकारी योगेश गडकर, सचिन धनवाई, निवृत्ती मोरे, अविनाश राऊत, राजुरेश्वर अर्बन बँकेचे मॅनेजर सागर सपकाळ, श्याम आवटी,, नरेंद्र कांबळे, राम चापले, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अलके सोमानी यांनी केले. तर आभार सागर सपकाळ यांनी मानले.

अल्पावधीत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला —— सौ निर्मलाताई दानवे ——-================ महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता

Read more

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी योगेश अशोकराव निकम

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब व महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल कार्यकारी संपादक मधुकर भुजंग साहेब संपादक

Read more

*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे* *जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान* *युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम* जाफराबाद(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम असून वर्तमानपत्रे आजही आपली लोकप्रियता कायम ठेऊन असल्याचे प्रतिपादन जाफराबाद चे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले.जाफराबाद येथे युगंधर प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित सन्मान लेखणीचा/दर्पण पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी शिवसेना नेते रमेश गव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, नगराध्यक्षा डॉ सुरेखा लहाने, उपनगराध्यक्ष दामूअण्णा वैद्य, गटनेते मुजीब शेख,नगरसेवक दिपक वाकडे, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलीक मुठ्ठे, भाजप शहराध्यक्ष प्रा.निवृत्ती दिवटे, सरपंच गौतम म्हस्के, गटशिक्षणाधिकारी अरुण नंद, विस्तार अधिकारी रामकुमार खराडे,पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रदिप बोबडे, मोहन मुळे, पी जी तांबेकर,भगवान सिंग इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री इंगळे यांनी पत्रकारांनी सजग राहून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे. *रमेश गव्हाड*-यावेळी बोलताना रमेश गव्हाड म्हणाले कि पत्रकारांच्या लेखणीत क्रांती घडवण्याची ताकद असून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करून स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी युगंधर टीम चे कौतुक केले. *रामधन कळंबे*-यावेळी बोलताना रामधन कळंबे म्हणाले कि आज शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था यावरचा जनतेचा विश्वास कमी होत असतानाच पत्रकारांवरील विश्वास कायम असून तो कायम राहील अशा स्वरूपाची पत्रकारिता पत्रकारांनी करावी,समाजव्यवस्था बदलण्याची ताकद लेखणीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ.लहाने, पी.जी.तांबेकर, मोहन मुळे, ज्ञानेश्वर पाबळे,गौतम म्हस्के, अरुण नंद यांची ही भाषणे झाली.यावेळी तालुक्यातील 80 पत्रकारांना आकर्षक सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनोद कळंबे तर आभार धनंजय मुळे यांनी मानले.यावेळी गजानन उदावंत,चेतन बायस,मुकेश भारद्वाज,विशाल वाकडे,प्रल्हाद लोणकर,पांडुरंग राऊत ,प्रा वाहेद पटेल नितिन राऊत,सय्यद अय्युब,मुजाहेद पठाण,राहुल गवई,हरी भालके,शेख अजीम,रावसाहेब अंभोरे,संजय राऊत,अलकेश सोमाणी ,बालाजी शेवाळे,बाळासाहेब गव्हले,संतोष गौरकर,सुनिल जोशी,सुनिल भाले,फेरोज शेख,बी डी सवडे,शेख साबेर,फकरू कुरेशी,शंकर सवडे,गजानन शेळके,चंद्रकांत पंडीत, गजानन देठे ,प्रा दत्ता देशमुख,शेख अशपाक ,प्रल्हाद जाधव,राजू करवंदे,अशोक पाबळे,खालेद सिद्दीकी,अनिल भाले,मनोज परदेशी मुकेश भारद्वाज,भगवानसिंग इंगळे असलम पठाण ,जहिरयार खान तालेब पठाण,विजय भवर,मंगल भारद्वाज,ज्ञानेश्वर गंगावणे,श्याम भाग्यवंत,दिनकर पंडीत,अर्षद शेख शेख इम्रान यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अल्ताफ शेख, सुनिल जोशी, कैलास सुसर यांनी परिश्रम घेतले.

*इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कितीही बोलबाला झाला तरी पत्रकारांच्या लेखनातील धार कायम-इंगळे* *जाफरबादेत 80 पत्रकारांचा सन्मान* *युगंधर प्रतिष्ठाण चा उपक्रम* जाफराबाद(प्रतिनिधी) इलेक्ट्रॉनिक

Read more

ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल विदर्भ प्रतिनिधी चेतन हिंगे. दर्यापूर : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत सांगणक परिचालक संघटनेच्या

Read more

पश्चिमी चक्रवाताचा परिणाम…!राज्यात कडाक्याची थंडीने जोर धरला.

पुणे: राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा जोर धरू लागली आहे. या विषयी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

Read more
Translate »
error: Content is protected !!