*माहेरजवळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक वाटप व नवागतांचे स्वागत* शैक्षणिक वर्ष सन 2024-25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहेरजवळा या ठिकाणी दाखल पात्र मुलांचे स्वागत सत्कार व पुस्तक वितरण करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रमेश सरोदे, श्री. संतोष राठोड श्री. भारत भोसले, श्री. कैलास भोसले, श्री. दिनकर शिंदे तसेच इतर पालक वर्ग व शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुलदीपके सर व सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत सर्व मुलांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. त्याचबरोबर अध्यापनास सुरुवात केली. याबरोबरच अध्यक्ष, शिक्षक व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांना गोड खाऊ वाटप करण्यात आला. व शेवटी मुलांचा मनोरंजक खेळ घेऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. अशाप्रकारे अतिशय आनंदमय वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस संपन्न झाला.

*माहेरजवळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक वाटप व नवागतांचे स्वागत* शैक्षणिक वर्ष सन 2024-25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहेरजवळा या

Read more

परभणी जिल्ह्यातील कृत्रिम खत टचाईमुळे शेतकरी हवालदिल खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे यांची तक्रार परभणी जिल्हा प्रतिनिधी. आयुब आतार परभणी. जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी चालू झाली असून शेतकऱ्यांना खताची अत्यंत आवश्यकता असताना बाजारात खाते उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे खतासाठी तो शेतकरी शेतीचे कामे सोडून खत मिळवण्यासाठी बाजारात फिरावे लागत असल्याने याबाबत खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे परभणी जिल्ह्यात खताची टंचाई केली आहे का व्यापारी जाणून-बुजून खताची टंचाई निर्माण करीत आहेत याची शहानिशा करून परभणी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सर्व प्रकाराची खते त्वरित उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना खासदार संजय जाधव यांनी केली आहे यावेळी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह संचालक रावसाहेब रेंगे, माऊली खरवडे, रामचंद्र आमले, यादी उपस्थित होते

परभणी जिल्ह्यातील कृत्रिम खत टचाईमुळे शेतकरी हवालदिल खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे यांची तक्रार परभणी जिल्हा प्रतिनिधी. आयुब आतार परभणी.

Read more

ससानेनगर हडपसर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जी दगड फेक झाली त्याचा निषेध म्हणुन हडपसर बंद पुणे जिल्ह्यात प्रतिनिधी पिंपरी चिंचवड लक्ष्मण भिमाशंकर खैराटे *दिं १६/६/२०२४ , वार – रविवार रोजी संपुर्ण हडपसर व शेवाळवाडी ऊपबाजार (शेवाळवाडी तरकारी मार्केट) संपुर्ण दिवस बंद राहील.* याची सर्व शेतकरी व व्यापार्यांनी नोंद घ्यावी. अत्याअावशक सेवा सोडुन. (अत्याअवशक सेवा चालु राहातील) *दगड मारणार्या आतंकवाद्याचा जाहिर निषेध.* . *सकल हिंदू हडपसर*

ससानेनगर हडपसर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जी दगड फेक झाली त्याचा निषेध म्हणुन हडपसर बंद पुणे जिल्ह्यात

Read more

आई डब्बा दे ना ग. मला शाळेत जायचय….. आज पासून राज्यातील सर्व शाळा सुरू प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर आज पासून महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद असेल खाजगी असेल सर्व शाळांना आजपासून सुरुवात झाली आज पासून शाळेची घंटा होणार सुरू मुला मुलींची शाळेतील धावपळ आजपासून सुरू राहणार आहे सर्व शिक्षक वृंद सुद्धा शाळेमध्ये अगोदरच हजर होते आज जिल्हा परिषद शाळांमध्ये पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक जमील मन्सुरी सर नवगिरे सर सोनवणे मॅडम रोजेकर सर श्याम डोंगरे सर उपस्थित होते जिल्हा परिषद शाळांमध्ये आजपासूनच भरपूर विद्यार्थी हजर होते

आई डब्बा दे ना ग. मला शाळेत जायचय….. आज पासून राज्यातील सर्व शाळा सुरू प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर आज पासून

Read more

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली वैजापूर येथे आढावा बैठक प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर लोकसभा निवडणुक व आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वैजापूर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आज संपन्न झाली.या बैठकीस उपस्थित राहून आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत सूचना केल्या. याप्रसंगी माझ्यासमवेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्क संघटिका ज्योतीताई ठाकरे,विभागीय सचिव अशोक पटवर्धन, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे,संजय निकम, उत्तम निकम,अंकुश सूंभ,जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, लताताई पगारे,तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभासंघटक मनाजी मिसाळ, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण,तालुका संघटक मनोज गायके, दिनकर पवार व विधानसभाप्रमुख डाॅ.राजीव डोंगरे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतली वैजापूर येथे आढावा बैठक प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर लोकसभा निवडणुक व

Read more

कोंढवा खुर्द चौकात आंदोलन करण्याची पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे मागणी. रस्त्याच्या खड्ड्याला चॅम्पर नसल्यामुळे अपघात होत आहेत. पुणे प्रतिनिधी कुणाल लोणकर कोंढवा गाव पश्चिम हद्दीतील नागरी वसाहतीतील नागरिक कोंढवा खुर्दच्या रस्त्यावर येतात. वाहनांची संख्या मोठी असल्याने कोंढवा मुख्य रस्त्यावरील वरील रस्त्याच्या खड्ड्याला चॅम्पर नसल्यामुळे अपघात होत आहेत. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी चांफेर होणे गरजेचे असल्याचे पोलिस अधिकारी व स्थानिक नागरिकांसह रस्त्यांची पाहणी करताना निदर्शनास आले. तसेच मुख्य मार्गावर असलेल्या ब्रह्मा अव्हेन्यू सोसायटीने शिवनेरीनगरला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला चॅम्पर्स विकसित करावेत, अशी मागणी पुणे महापालिकेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील यांना करण्यात आले. यावेळी लवकरच या जागेवर पुढील कारवाई करण्यात येईल, असे मा. पाटील यांनी आश्वासन दिले.

कोंढवा खुर्द चौकात आंदोलन करण्याची पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे मागणी. रस्त्याच्या खड्ड्याला चॅम्पर नसल्यामुळे अपघात होत आहेत. पुणे प्रतिनिधी कुणाल लोणकर

Read more

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत विद्यार्थ्यांमध्ये शालेय गोडी निर्माण व्हावी म्हणून “ही आवडते मज मनापासूनी शाळा ” हे प्र. के. अत्रे लिखित गीताचे गायन विद्यालयात नियमित करावे पुणे जिल्हा उपसंपादक उषा सोनवणे पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नविन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात रांगोळ्या घालून, पुष्पवर्षाव करून व चॉकलेट वाटप करून स्वागत करण्यात आले. विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर (माजी राज्यमंत्री ), सचिव चंद्रकांत ससाणे सर, दत्तोबा जांभूळकर ( सरपंच – वानवडी गाव देवस्थान ट्रस्ट, पुणे ), मायाताई ससाणे (सामाजिक कार्यकर्त्या) तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक लहू वाघुले सर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना चॉकलेट, गुलाबपुष्प व शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सचिव चंद्रकांत ससाणे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शालेय साहित्य व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. खूप शिका, कष्ट करा, मोठे व्हा, असा मोलाचा संदेश दिला. तसेच शासनाने सुरु केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली. माजी राज्यमंत्री व विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी सर्व प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व देशभक्तीपर गीतांचे गायन करावे, आणि ते आपल्या अंत:करणातून व्हायला पाहिजे, ही अपेक्षा व्यक्त केली.. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शालेय गोडी निर्माण व्हावी म्हणून “ही आवडते मज मनापासूनी शाळा ” हे प्र. के. अत्रे लिखित गीताचे गायन विद्यालयात नियमित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणव्यवस्थेचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा अभ्यास करावा, आज स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सचिव पदापर्यंत मजल मारावी,असे विद्यार्थी आपल्या विद्यालयातून घडावे, अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे, शाळेचे तसेच आपल्या राष्ट्राचे नाव उंचवावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले. यावेळी विद्यालयाच्या जडणघडणीचा व उन्नतीचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून या विद्यालयाचा प्रारंभ केल्याचे सांगून हे कार्य आजही अव्याहतपणे चालू असल्याचे सांगितले. शाळेच्या सुरुवातीपासूनच साहेब सर्व विद्यार्थ्यांना मोफत वहया, बूट, शालेय गणवेश देत आहेत. या शाळेचे कर्तृत्व खूप मोठे आहे, असे सांगून असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच नवागतांचे स्वागत करण्यामागील हेतू विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, खूप शिकून मोठे व्हा, असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सचिव चंद्रकांत ससाणे सर, वानवडी गावचे सरपंच दत्तोबा जांभूळकर, मायाताई ससाणे, अनंतरावं शिवरकर,इब्राहिम शरीफ, रमेश काकडे, सुरेश तेलंग, सतिश सांगळे, रमेश जाधव, जगन्नाथ खोपकर, सूर्यकांत देडगे, चंद्रकांत तोंडारे, प्रवीण जाधव, दत्तात्रय शिवरकर, रहमान शेख, राजू अडागळे, अजित कवडे, गणेश कवडे, राजेंद्र डांगी, सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक लहू वाघुले सर, सर्व शिक्षक वृंद, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लहू वाघुले सर यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीपा व्यवहारे यांनी केले.

विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत विद्यार्थ्यांमध्ये शालेय गोडी निर्माण व्हावी म्हणून “ही आवडते मज मनापासूनी शाळा ” हे प्र.

Read more

*मुंबईत २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन* *मुंबई दि. १४ :* राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दि. २८ जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाळी अधिवेशन दि. २७ जून ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार दि.२९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील,असे या बैठकीत ठरविण्यात आले. 0000

*मुंबईत २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन* *मुंबई दि. १४ :* राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, दि. २७

Read more

*देशात पहिल्यांदाच केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित* *चांगला पायंडा पडल्याने प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त* *पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी* *केंद्रीय कृषि मंत्र्यांना देखील भेटणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई दि.११- तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आज केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांविषयीची वचनबद्धता प्रकट केल्याबद्दल या बैठकीस उपस्थित विविध राज्यांच्या प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून प्रशंसाही केली. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची ही बैठक होती. सह्याद्री अतिथीगृहात आज केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमन तसेच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले व शेतमालाला चांगली किंमत व बाजारपेठ मिळावी यासाठी पंतप्रधानांसमोर आपलं म्हणणं नुकतचं मांडले असल्याचे ते म्हणाले. *लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार* यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सोयाबीन, कांदा, कापूस या शेतमालाला चांगली आधारभूत किंमत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नी देखील आपण लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार आहोत. आज मिलेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळायचे असेल तर मायक्रो मिलेटस् ना देखील किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्याची विचारधारा एकच असून पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत. गेल्या दहा वर्षात याची प्रचिती आली आहे. पंतप्रधानपदी शपथ घेतल्यावर नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आज राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निर्णय घेतले असून गेल्या वर्षभरात नुकसान भरपाईपोटी पंधरा हजार कोटी रुपये दिले आहेत. *पर्यावरणाला पूरक बांबूची लागवड* यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाढत्या प्रदूषण आणि तापमानावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मी स्वत:ही शेतकऱ्याचा मुलगा असून मी वारंवार संबधित तज्ज्ञ व्यक्तिंशी यावर बोलत असतो. मी गावी गेलो की, आवर्जुन झाडे लावतो. विविध प्रकारची पिके घेतो. गेल्या वर्षभरापासून पर्यावरणाला पूरक अशा बांबू लागवडीला आम्ही मिशन मोडवर सुरुवात केली आहे. आमचे राज्य यामध्ये देशात आघाडीवर असून बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते. यासाठी दहा लाख हेक्टरचे उद्दीष्ट ही ठरवण्यात आले आहे. बांबूच्या अनेक प्रजाती असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, त्यामुळे टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहोत. महाराष्ट्र हे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेमध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान करण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये शेतीचा देखील मोठा सहभाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. *प्रतिनिधींकडून स्वागत* केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या बैठकीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली असून यामुळे आता या आयोगाच्या ज्या राज्यांमध्ये बैठका होतील तिथे त्या- त्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचा पायंडा पडेल, असे राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगताच उपस्थित शेतकरी व प्रतिनिधींनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. यावेळी बोलतांना पाशा पटेल यांनी मिलेट उत्पादनासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कशा रितीने पुढाकार घेतला ते सांगितले. पर्यावरणासारख्या महत्वाच्या विषयावर मुख्यमंत्री स्वत: टास्क फोर्सचे अध्यक्ष झाले यावरुन राज्य सरकार या विषयी किती गंभीर याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलतांना आयोगाने अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करावा व पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विजय पाल शर्मा यांनी देखील आपल्या भाषणात कृषि विस्तार यंत्रणा मजबूत करणे, खतांचा वापर कमी करणे, कृषि यांत्रिकीकरणावर जोर देणे,खरीपामधील पिकांना देखील एमएसपीचा फायदा मिळवून देणे. खाजगी क्षेत्राची भागिदारी व गुंतवणूक वाढविणे यादृष्टीने आयोग काम करत असल्याचे सांगितले. 00000

*देशात पहिल्यांदाच केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित* *चांगला पायंडा पडल्याने प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त* *पिकांना चांगली किमान

Read more

*कृषी विभागाने अधिकृत परवानगी दिलेल्या बी बियाणे,औषधी व रासायनिक व जैविक खते यांची यादी प्रसिद्ध करून शेतकर्यांना पाहीजे ती बियाणे,औषधी व खतांचा मुबलक पुरवठा करावा* बातमीदार धरमसिंग बिमऱोट छ. संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी बातमी दि १० जुन २०२४ रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने राहुल ढोले पाटील व इंजी. महेशभाई गुजर यांनी तालुका कृषी अधिकारी गंगापुर श्री.जायभाय यांना केली आहे दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने हंगामात पेरणीसाठी उपयुक्त रासायनिक व जैविक बियाणे औषधी खतांची तपासणी करून अधिकृतपणे विक्री करण्यासाठी परवानगी देत असते त्यामुळे शेतकर्यांना चांगली रासायनिक व जैविक बियाणे, औषधी व खते उपलब्ध होत असतात. आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की कृषी विभागाने अधिकृत परवानगी रासायनिक व जैविक दिलेल्या बी बियाणे औषधी व खते यांची यादी वर्तमान पञ, सोसीयल मिडीया वर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करून गंगापुर तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्र फलकावर लावण्या बाबत सक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकर्यांना चांगली अधिकृत बियाणे औषधी व खते मिळतील. तसेच शेतकर्यांना चांगली व हमखास उत्पन्न देणारे बियाणे औषधी खतांची चांगली माहिती असल्याने दरवर्षी त्याच कंपनीचे बियाणे औषधी खतांची मागणी शेतकरी करत असतात त्यामुळे अनेकदा मागणी वाढल्याने उत्पादन करणारी कंपनी व कृषी सेवा केंद्र कृञीम टंचाई निर्माण करून काळा बाजार करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकर्यांना पाहिजे ती बियाणे औषधी खत जास्त कमीतीने खरेदी करावे लागते त्यामुळे शेतकर्यांना हवी ती बियाणे औषधी खतांचा पुरवठा व्हावा तसेच कृञीम टंचाई निर्माण होणार नाही यांची काळजी घेण्यात यावी असे निवेदन दिले आहे.

*कृषी विभागाने अधिकृत परवानगी दिलेल्या बी बियाणे,औषधी व रासायनिक व जैविक खते यांची यादी प्रसिद्ध करून शेतकर्यांना पाहीजे ती बियाणे,औषधी

Read more
Translate »
error: Content is protected !!