*सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन व नदी स्वच्छता अभियान संपन्न* (दत्ता देशमुख याकडून )-जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने 17 व 18 सप्टेंबर 2024 रोजी *ग्रीन क्लब *व * राष्ट्रीय सेवा योजना* विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जाफराबाद येथे, गणपती विसर्जना निमित्त निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा उद्देश जे निर्माल्य पाण्यामध्ये विसर्जित केल्या जाते त्यामुळे जल प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. तो टाळण्याकरिता महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण तसेच पाण्याची बचत या अभियानांतर्गत अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने रेपाळा रोड येथील गणपती विसर्जनाच्या ठिकाणी जाऊन महाविद्यालयातील युवकांनी निर्माल्य संकलित केले तसेच या निर्माल्याचे संकलन केल्यानंतर जैविक खत तयार करण्यासाठी या निर्माल्याचा महाविद्यालयीन परिसरातील झाडांसाठी सेंद्रिय खत म्हणूनवापर करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 18 सप्टेंबर 2024 वार बुधवार रोजी ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकां मार्फत नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने जाफराबाद शहराची जीवनदायिनी पूर्णानदी येथे स्वयंसेवकांनी नदी पात्रामधील निर्माल्य, प्लास्टिक बॅग व इत्यादी प्लास्टिक साहित्य नदीपात्रातून काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. या अभियानासाठी प्राचार्य डॉ. र . तु. देशमुख उपप्राचार्य विनोद हिवराळे तसेच ग्रीन क्लबचे प्रमुख प्रा. मनीष बनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. संजय साळवे, डॉ. निलेश भोसले भोसले, डॉ. डी. टी. तांगडे, डॉ. मोहरी एस. पी. डॉ. संतोष पहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्वयंसेवक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
*सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने निर्माल्य संकलन व नदी स्वच्छता अभियान संपन्न* (दत्ता देशमुख याकडून )-जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीने 17 व
Read more