अल्पावधीत स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला —— सौ निर्मलाताई दानवे ——-================ महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन संपन्न झाला. माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी स्वामी विवेकानंद पतसंस्था स्थापन झाली. या पतसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या सुविद्या पत्नी सौ निर्मलाताई दानवे, यांनी स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या कार्याबद्दल, गौरवोद्गार काढताना सांगितले की स्वामी विवेकानंद पतसंस्थेने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन केला. चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे, तसेच लोकांशी संवाद साधण्याची कला अस्तित्वात असल्यामुळे हा विश्वास संपादन करता आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मुकुंदा आवटी यांनी संस्थेचा लेखाजोखा म्हणून प्रास्ताविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम पाटील म्हस्के यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई म्हस्के, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शोभाताई मतकर, आशाताई माळी, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, टेंभुर्णीच्या सरपंच सुमनताई मस्के यांचे प्रतिनिधी गौतम दादा मस्के, यांची आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी संवाद साधताना पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व टेंभुर्णीतील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पीजी तांबेकर, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे प्रभात तालुका अध्यक्ष शेख अशपाक, संजय राऊत नसीम शेख, शेख साबिर, प्रल्हाद जाधव, बालाजी शेवाळे, बिडी सवडे, गजानन शेळके, अल्केश सोमानी, कामाच्या व्यस्ततेमुळे भेट देऊन गेलेले प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची जालना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख, आदींचा यथोचित. सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये चेअरमन मुकुंद आवटी, व्हाईस चेअरमन शिवहरी मुळे, संस्थेच्या सचिव रेवती आवटी,प्रसिद्ध चित्रकार तथा संचालक संतोष आवटी, ज्येष्ठ संचालक गुलाबराव शिंदे, डॉक्टर अविनाश सुरवसे, रुस्तुम राव बोर्डे, अल्केश सोमानी, बद्री शेठ अग्रवाल, गजानन शेळके काशिनाथ गायमुखे, मंगेश वाणी, संचालिका जयश्री आवटी, सरला आवटी तसेच संस्थेचे कर्मचारी तथा वसुली अधिकारी योगेश गडकर, सचिन धनवाई, निवृत्ती मोरे, अविनाश राऊत, राजुरेश्वर अर्बन बँकेचे मॅनेजर सागर सपकाळ, श्याम आवटी,, नरेंद्र कांबळे, राम चापले, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी अनेक सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अलके सोमानी यांनी केले. तर आभार सागर सपकाळ यांनी मानले.