आम आदमी पार्टी राज्यातील सर्व निवडणुका ताकदीने लढणार – आप प्रचार प्रमुख रंगा दादा राचुरे


आम आदमी पार्टी राज्यातील सर्व निवडणुका ताकदीने लढणार – आप प्रचार प्रमुख रंगा दादा राचुरे

छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र लोक न्यूज योगेश निकम पाटील

आम आदमी पक्ष हा देशातील राजकीय इतिहासात अत्यंत झपाट्याने वाढणारा पक्ष असून राज्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे प्रचार प्रमुख रंगा दादा राजुरे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित पक्षाच्या आडवा बैठकीत केले.

राज्यातील आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीसोबत आघाडी स्थापन केली आहे. लोकशाहीच्या हितासाठी आम आदमी पार्टी ही राज्यातील लोकसभा, विधानसभा, नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीने लढणार असून आम आदमी पार्टीकडे 200 पेक्षा जास्त राज्यातील ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत. 30 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आम आदमी पार्टीच्या ताब्यात आहेत. राज्यात 25 हजार पेक्षा जास्त मोठ्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. मात्र शासन निवडणुका घ्यायला घाबरत असल्याने आम्हाला आमची ताकद दाखवता आली नाही. तरी येणाऱ्या 2024 च्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी राज्यामध्ये ताकदीने लढणार असून कार्यकर्त्यांनी “कामाला लागावे” असेही यावेळी श्री रंगा दादा राचूरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Advertisement

ते राहुल कल्चरल हॉल येथे आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आप च्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई गुट्टे, राज्य सहसचिव वैजिनाथ राठोड, राज्य महिला सहसचिव ज्योतीताई जाधव, महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा संघटनमंत्री सतीश देवेंद्र लोखंडे वेरुळकर, जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, शहराध्यक्ष इमरान शेख उस्मान, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष सलाहुद्दीन नेहरी, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष खाजा किस्मतवाला,जिल्हा संघटन मंत्री संजय चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!