*सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न* ==================== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्ता देशमुख याकडून ) विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे उपस्थितांनी लुटला मनमुराद आनंद जाफराबाद प्रतिनिधी :दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ येथील सिद्धार्थ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाले.स्नेहसंमेलच्या पहिल्या सत्राचे सकाळी१०वा. उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दादासाहेब मस्के, संस्थापक अध्यक्ष -सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जाफराबाद येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश वाकडे पाटील, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलिक मुट्ठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,माजी शाखा अधिकारी प्रकाश राऊत ,भा.बौ.म. जाफराबाद तालुकाध्यक्ष प्रकाश राऊत आदी निमंत्रित उपस्थित होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे फीत कापून रीतसर उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत महाविद्यालयाची शैक्षणिक ,क्रीडा ,सांस्कृतिक आणि गुणवत्ता इत्यादींची यशस्वी वाटचाल उपस्थित मान्यवरांना अवगत करून दिली .शैक्षणिक वर्ष २०२३-२३ चा वार्षिक अहवाल वाचन प्रा.रमेश उबाळे यांनी केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर संलग्न हजार पेक्षा जास्त महाविद्यालय कार्यरत असून ग्रामीण भागातील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे शैक्षणिक, सांस्कृतिक ,क्रीडाविषयक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचा नावलौकिक असल्याने विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब मस्के यांनी महाविद्यालयाची स्थापना मोठ्या कठीण परिस्थितीत केली असून सध्या हे महाविद्यालय जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर जालना जिल्ह्यामध्ये पदवी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी व तसेच संशोधन शिक्षनासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनंदा सोनुने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.मनोज पगारे यांनी मानले. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.रमेश उबाळे आणि सह समन्वयक डॉ. एम.जी.मोरे यांच्या देखरेखीखाली विविध समित्या स्थापन करून आनंदनगरी ,भित्तिपत्रिका अनावरण ,रांगोळी स्पर्धा ,विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रा. बी. जी.बाविस्कर आणि प्रा.एस.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी, भारुड, हिंदी मराठी चित्रपट गीत,शेलापागोटे ,संगीत शेलापागोटे, नृत्य आशा विविध कलागुणांमुळे उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला व सहभागी विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून जोरदार प्रोत्साहित केले. स्नेहसंमेलनाच्या द्वितीय सत्रात सायंकाळी ४ वा. पारितोषिक वितरण व समारोप समारंभ पार पडला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.राहुलजी मस्के ,सचिव सिल्लोड शिक्षण संस्था तथा माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.संजय मोहड, संगीत विभाग प्रमुख- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर होते .मा. अध्यक्ष दादासाहेब मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख ,उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.सुनील मेढे, उप प्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रोफेसर डॉ. सुनील मेढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रमुख पाहुणे डॉ. संजय मोहड यांनी वामनदादा कर्डक यांचे गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य प्रा. राहुल भाऊ मस्के यांनी केला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील महाविद्यालयामार्फत विविध स्पर्धा ,विद्यापीठ स्तरीय स्पर्धा व तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा पारितोषिक, प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.अनिल वैद्य यांनी केले तर आभार प्रा.मनीष बनकर यांनी मांनले. राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाची सांगता झाली


*सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न* ==================== महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी दत्ता देशमुख याकडून )
विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे उपस्थितांनी लुटला मनमुराद आनंद
जाफराबाद प्रतिनिधी :दिनांक १७ फेब्रुवारी २०२४
येथील सिद्धार्थ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाले.स्नेहसंमेलच्या पहिल्या सत्राचे सकाळी१०वा. उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दादासाहेब मस्के, संस्थापक अध्यक्ष -सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जाफराबाद येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश वाकडे पाटील, नगरसेवक अनिल बोर्डे, शिवसेना तालुकाप्रमुख कुंडलिक मुट्ठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ,माजी शाखा अधिकारी प्रकाश राऊत ,भा.बौ.म. जाफराबाद तालुकाध्यक्ष प्रकाश राऊत आदी निमंत्रित उपस्थित होते
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे फीत कापून रीतसर उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांनी महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत महाविद्यालयाची शैक्षणिक ,क्रीडा ,सांस्कृतिक आणि गुणवत्ता इत्यादींची यशस्वी वाटचाल उपस्थित मान्यवरांना अवगत करून दिली .शैक्षणिक वर्ष २०२३-२३ चा वार्षिक अहवाल वाचन प्रा.रमेश उबाळे यांनी केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. व्यंकटेश लांब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर संलग्न हजार पेक्षा जास्त महाविद्यालय कार्यरत असून ग्रामीण भागातील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे शैक्षणिक, सांस्कृतिक ,क्रीडाविषयक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचा नावलौकिक असल्याने विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब मस्के यांनी महाविद्यालयाची स्थापना मोठ्या कठीण परिस्थितीत केली असून सध्या हे महाविद्यालय जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर जालना जिल्ह्यामध्ये पदवी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी व तसेच संशोधन शिक्षनासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनंदा सोनुने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.मनोज पगारे यांनी मानले.
वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्राचार्य डॉ. रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.रमेश उबाळे आणि सह समन्वयक डॉ. एम.जी.मोरे यांच्या देखरेखीखाली विविध समित्या स्थापन करून आनंदनगरी ,भित्तिपत्रिका अनावरण ,रांगोळी स्पर्धा ,विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रा. बी. जी.बाविस्कर आणि प्रा.एस.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी, भारुड, हिंदी मराठी चित्रपट गीत,शेलापागोटे ,संगीत शेलापागोटे, नृत्य आशा विविध कलागुणांमुळे उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला व सहभागी विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवून जोरदार प्रोत्साहित केले. स्नेहसंमेलनाच्या द्वितीय सत्रात सायंकाळी ४ वा. पारितोषिक वितरण व समारोप समारंभ पार पडला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.राहुलजी मस्के ,सचिव सिल्लोड शिक्षण संस्था तथा माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.संजय मोहड, संगीत विभाग प्रमुख- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर होते .मा. अध्यक्ष दादासाहेब मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश देशमुख ,उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.सुनील मेढे, उप प्राचार्य प्रा.विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रोफेसर डॉ. सुनील मेढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्रमुख पाहुणे डॉ. संजय मोहड यांनी वामनदादा कर्डक यांचे गीत गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य प्रा. राहुल भाऊ मस्के यांनी केला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील महाविद्यालयामार्फत विविध स्पर्धा ,विद्यापीठ स्तरीय स्पर्धा व तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा पारितोषिक, प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.अनिल वैद्य यांनी केले तर आभार प्रा.मनीष बनकर यांनी मांनले. राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाची सांगता झाली


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!