नवी दिल्ली:- लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. दरम्यान, मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी, सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केलं. संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केलं. यानंतर जे पी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन, मोदींचं स्वागत करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.


नवी दिल्ली:- लोकसभा निवडणूक निकाल

Advertisement

2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. दरम्यान, मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी, सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केलं. संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केलं. यानंतर जे पी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन, मोदींचं स्वागत करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!