नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहा नाश्तावेळी कॅबिनेट मंत्री आणि खासदारांची भेट घेतली. या बैठकीत मोठ्या संख्येने नेते सहभागी होते. मोदी 3.0 मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या बहुतेक खासदारांना कॉल येणे सुरू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खासदारांना मंत्रिमंडळात समावून घ्यायचे आहे, त्यांच्या नावाची यादी समोर आली असून त्यात भाजपच्या डझनहून अधिक खासदारांची आणि मित्रपक्षांच्या डझनहून अधिक खासदारांची नावे समोर आलीय आहेत.


एनडीएच्या मंत्रिमंडळात कोण-कोण घेणार शपथ; महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांची लागली वर्णी, यादी आली समोर

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ४१ खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहा नाश्तावेळी कॅबिनेट मंत्री आणि खासदारांची भेट घेतली. या बैठकीत मोठ्या संख्येने नेते सहभागी होते.

मोदी 3.0 मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या बहुतेक खासदारांना कॉल येणे सुरू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खासदारांना मंत्रिमंडळात समावून घ्यायचे आहे, त्यांच्या नावाची यादी समोर आली असून त्यात भाजपच्या डझनहून अधिक खासदारांची आणि मित्रपक्षांच्या डझनहून अधिक खासदारांची नावे समोर आलीय आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे केंद्रीय संरक्षण मंत्री राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गृहमंत्रालयाची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे राहू शकते. मोदी ३.० सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जाताहेत.

Advertisement

महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे रामदास आठवले यांना फोन आलाय. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटलंय. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय.

आतापर्यंत शपथविधीसाठी निरोप आलेले खासदार-

अमित शाह

राजनाथ सिंह

नितिन गडकरी

एस जयशंकर

पीयूष गोयल

प्रल्हाद जोशी

जयंत चौधरी

जीतनराम मांझी

रामनाथ ठाकुर

चिराग पासवान

एच डी कुमारस्वामी

ज्योतिरादित्य सिंधिया

अर्जुन राम मेघवाल

प्रताप राव जाधव

रक्षा खड़से

जितेंद्र सिंह

रामदास अठवले

किरेन रिजुजु

राव इंद्रजीत सिंह

शांतनु ठाकुर

मनसुख मांडविया

अश्विनी वैष्णव

बंडी संजय

जी किशन रेड्डी

हरदीप सिंह पुरी

बी एल वर्मा

शिवराज सिंह चौहान

शोभा करंदलाजे

रवनीत सिंह बिट्टू

सर्वानंद सोनोवाल

अन्नपूर्णा देवी

जितिन प्रसाद

मनोहर लाल खट्टर

हर्ष मल्होत्रा

नित्यानंद राय

अनुप्रिया पटेल

अजय टमटा

धर्मेंद्र प्रधान

निर्मला सीतारामन

सावित्री ठाकुर

राम मोहन नायडू किंजरापु

चंद्रशेखर पेम्मासानी

मुरलीधर मोहल

कृष्णपाल गुर्जर

गिरिराज सिंह

गजेंद्र सिंह शेखावत

श्रीपद नायक

सी आर पाटील


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!