- शासन मान्य रजिस्टर क्रमांक. MH13-130049092
- *कृषी विभागाने अधिकृत परवानगी दिलेल्या बी बियाणे,औषधी व रासायनिक व जैविक खते यांची यादी प्रसिद्ध करून शेतकर्यांना पाहीजे ती बियाणे,औषधी व खतांचा मुबलक पुरवठा करावा* बातमीदार धरमसिंग बिमऱोट छ. संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी बातमी दि १० जुन २०२४ रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने राहुल ढोले पाटील व इंजी. महेशभाई गुजर यांनी तालुका कृषी अधिकारी गंगापुर श्री.जायभाय यांना केली आहे दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने हंगामात पेरणीसाठी उपयुक्त रासायनिक व जैविक बियाणे औषधी खतांची तपासणी करून अधिकृतपणे विक्री करण्यासाठी परवानगी देत असते त्यामुळे शेतकर्यांना चांगली रासायनिक व जैविक बियाणे, औषधी व खते उपलब्ध होत असतात. आपल्याला या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की कृषी विभागाने अधिकृत परवानगी रासायनिक व जैविक दिलेल्या बी बियाणे औषधी व खते यांची यादी वर्तमान पञ, सोसीयल मिडीया वर अधिकृतरीत्या प्रसिद्ध करून गंगापुर तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्र फलकावर लावण्या बाबत सक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकर्यांना चांगली अधिकृत बियाणे औषधी व खते मिळतील. तसेच शेतकर्यांना चांगली व हमखास उत्पन्न देणारे बियाणे औषधी खतांची चांगली माहिती असल्याने दरवर्षी त्याच कंपनीचे बियाणे औषधी खतांची मागणी शेतकरी करत असतात त्यामुळे अनेकदा मागणी वाढल्याने उत्पादन करणारी कंपनी व कृषी सेवा केंद्र कृञीम टंचाई निर्माण करून काळा बाजार करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकर्यांना पाहिजे ती बियाणे औषधी खत जास्त कमीतीने खरेदी करावे लागते त्यामुळे शेतकर्यांना हवी ती बियाणे औषधी खतांचा पुरवठा व्हावा तसेच कृञीम टंचाई निर्माण होणार नाही यांची काळजी घेण्यात यावी असे निवेदन दिले आहे.