शिक्षणाकामी मिळाला मोका आरोपीस दोषारोपपत्र दाखल होण्याआधी जामीन. आनंद पार्क वडगाव शेरी या एरियात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक पुणे जिल्हा उपसंपादक उषा सोनवणे चंदन नगर पोलीस ठाणे येथील गु. र. क्र ५९१/२३, हा गुन्हा भा. द.वी कलम ३०७ प्रमाणे नोंदविण्यात आला होता व त्यात पुढे मोक्याची कारवाई करण्यात आल्यामुळे सदर खटल्याचे कामकाज हे विशेष मोका न्यायाधीश व्हीं आर कचरे साहेब यांच्या कोर्टात चालवण्यात आले. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे म्हणणे की मित्राचे भांडण सोडवायला गेले असता आनंद पार्क वडगाव शेरी या एरियात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर घटनेची व्हिडिओ क्लिप ही वायरल झाली होती. सदर खटल्यात आरोपी अक्षय ताकपरे याने जामीन अर्ज ठेवून त्याचा गुन्ह्याशी संबंध नसून व मोका कायद्यातील तरतुदी त्याला लागू होत नसल्याचे आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युक्तिवाद करण्यात आला होता, त्यांच्या विरोध करत सरकार पक्षाने सदर गुन्ह्याची व्हिडिओ फुटेज असून, सह आरोपी कडून कोयता जप्त करण्यात आल आहे, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करत जामीन अर्जास आक्षेप नोंदविला होता. विशेष मोका न्यायाधीश व्ही आर कचरे साहेब यांनी आरोपी अक्षय ताकपेरे याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि त्याच्यावर लावलेले आरोप हे कलम ३०७ याच्या कक्षेत बसणारे नसून त्याच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज मंजूर केला. तदनंतर आरोपी अमोल चोरगडे, राहुल बरवसा आणि हरिकेश चवान यांनी जामीन अर्ज सादर केले असता त्यांचा देखील वरील आरोपी सारखाच रोल असल्याकारणाने त्यांना ही जामीन देण्यात आला. वरील सर्व आरोपींच्या वतीने कामकाज युक्तिवाद एडवोकेट सुशांत तायडे यांनी केला आणि त्यांना प्रज्ञा कांबळे- तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी कामकाज पाहिले. अक्षत ताकपेरे याला वडील नसून त्याचे मामा त्याचा सांभाळ करीत त्याचे शिक्षणाचे बघत होते आणि त्याला तो शिक्षण घेत असलेले ठिकाणी डिप्लोमा इन टोल इंजिनिअरिंग मध्ये ९०% हजेरी अट होती, अश्या आरोपींवर मोक्या सारखी कडाक कार्यवाही करण्याआधी शासनाने विचार करायला हवा, फ्कत गुन्हेगारी वर आवर घळणे गरजेचे नाही, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित मुलांचे नुकसान तर होत नाही या कडे ही लक्ष द्यायला हवे.


शिक्षणाकामी मिळाला मोका आरोपीस दोषारोपपत्र दाखल होण्याआधी जामीन.

आनंद पार्क वडगाव शेरी या एरियात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक

पुणे जिल्हा उपसंपादक उषा सोनवणे

Advertisement

चंदन नगर पोलीस ठाणे येथील गु. र. क्र ५९१/२३, हा गुन्हा भा. द.वी कलम ३०७ प्रमाणे नोंदविण्यात आला होता व त्यात पुढे मोक्याची कारवाई करण्यात आल्यामुळे सदर खटल्याचे कामकाज हे विशेष मोका न्यायाधीश व्हीं आर कचरे साहेब यांच्या कोर्टात चालवण्यात आले. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे म्हणणे की मित्राचे भांडण सोडवायला गेले असता आनंद पार्क वडगाव शेरी या एरियात त्यांच्यावर कोयत्याने मारहाण व दगडफेक करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर घटनेची व्हिडिओ क्लिप ही वायरल झाली होती. सदर खटल्यात आरोपी अक्षय ताकपरे याने जामीन अर्ज ठेवून त्याचा गुन्ह्याशी संबंध नसून व मोका कायद्यातील तरतुदी त्याला लागू होत नसल्याचे आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याचे युक्तिवाद करण्यात आला होता, त्यांच्या विरोध करत सरकार पक्षाने सदर गुन्ह्याची व्हिडिओ फुटेज असून, सह आरोपी कडून कोयता जप्त करण्यात आल आहे, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद करत जामीन अर्जास आक्षेप नोंदविला होता. विशेष मोका न्यायाधीश व्ही आर कचरे साहेब यांनी आरोपी अक्षय ताकपेरे याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आणि त्याच्यावर लावलेले आरोप हे कलम ३०७ याच्या कक्षेत बसणारे नसून त्याच्या वकिलाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज मंजूर केला. तदनंतर आरोपी अमोल चोरगडे, राहुल बरवसा आणि हरिकेश चवान यांनी जामीन अर्ज सादर केले असता त्यांचा देखील वरील आरोपी सारखाच रोल असल्याकारणाने त्यांना ही जामीन देण्यात आला. वरील सर्व आरोपींच्या वतीने कामकाज युक्तिवाद एडवोकेट सुशांत तायडे यांनी केला आणि त्यांना प्रज्ञा कांबळे- तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी कामकाज पाहिले.
अक्षत ताकपेरे याला वडील नसून त्याचे मामा त्याचा सांभाळ करीत त्याचे शिक्षणाचे बघत होते आणि त्याला तो शिक्षण घेत असलेले ठिकाणी डिप्लोमा इन टोल इंजिनिअरिंग मध्ये ९०% हजेरी अट होती, अश्या आरोपींवर मोक्या सारखी कडाक कार्यवाही करण्याआधी शासनाने विचार करायला हवा, फ्कत गुन्हेगारी वर आवर घळणे गरजेचे नाही, त्यामुळे योग्य आणि सुशिक्षित मुलांचे नुकसान तर होत नाही या कडे ही लक्ष द्यायला हवे.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!