कामगारांसाठी अहोरात्र झटणारे बनकर दांपत्य महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून ) जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील सुनीता बनकर, रामदास बनकर हे बनकर कामगारांसाठी अहोरात्र झटणारे दांपत्य म्हणून पंचक्रोशीत त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. रामदास बनकर हे अल्पशिक्षित असून पत्नी सुनीता जेमतेम शिकलेली, भूमिहीन असणारे बनकर यांनी सुरवातीपासून सालगडी म्हणून तर पत्नी सुनीता यांनी रोजमजुरी केली.रोजमजुरी साठी सोबत असणाऱ्या महिला व त्यांची परिस्थिती अशा अनेक बाबीचा विचार करून त्यांनी गावातील महिला कामगार व पुरुष कामगार याची एक यादी बनवून निःशुल्क पणे सर्व महिला व पुरुषांची कामगार कल्याण विभागात नोंदणी करून अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. हातांवर पोट असणाऱ्या या बनकर दांपत्याने जवळपास परिसरातील दोनशेहुन अधिक मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना कामगार कल्याण विभागातून संसार उपयोगी साहित्य,कामगार सुरक्षा किट,कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अशा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. मोलमजुरी करणाऱ्या लोकांना लाभ मिळवून दिला तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी कमाई असल्याची त्यांनी सांगितले. बनकर दांपत्याने सातेफळ येथे 85 कामगारांना संसार उपयोगी साहित्य आणले ते साहित्य राष्ट्रवादी नेते ऍड रामकृष्ण बनकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी दत्ता बनकर,प्रल्हाद बनकर,तेजराव खंदारे, साहेबराव खंदारे, अमोल बनकर,आदी गावकऱ्यांची उपस्थित होती.
कामगारांसाठी अहोरात्र झटणारे बनकर दांपत्य
महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून )
जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील सुनीता बनकर, रामदास बनकर हे बनकर कामगारांसाठी अहोरात्र झटणारे दांपत्य म्हणून पंचक्रोशीत त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
रामदास बनकर हे अल्पशिक्षित असून पत्नी सुनीता जेमतेम शिकलेली, भूमिहीन असणारे बनकर यांनी सुरवातीपासून सालगडी म्हणून तर पत्नी सुनीता यांनी रोजमजुरी केली.रोजमजुरी साठी सोबत असणाऱ्या महिला व त्यांची परिस्थिती अशा अनेक बाबीचा विचार करून त्यांनी गावातील महिला कामगार व पुरुष कामगार याची एक यादी बनवून निःशुल्क पणे सर्व महिला व पुरुषांची कामगार कल्याण विभागात नोंदणी करून अनेकांना लाभ मिळवून दिला आहे.
हातांवर पोट असणाऱ्या या बनकर दांपत्याने जवळपास परिसरातील दोनशेहुन अधिक मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना कामगार कल्याण विभागातून संसार उपयोगी साहित्य,कामगार सुरक्षा किट,कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती अशा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
मोलमजुरी करणाऱ्या लोकांना लाभ मिळवून दिला तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी कमाई असल्याची त्यांनी सांगितले.
बनकर दांपत्याने सातेफळ येथे 85 कामगारांना संसार उपयोगी साहित्य आणले ते साहित्य राष्ट्रवादी नेते ऍड रामकृष्ण बनकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी दत्ता बनकर,प्रल्हाद बनकर,तेजराव खंदारे, साहेबराव खंदारे, अमोल बनकर,आदी गावकऱ्यांची उपस्थित होती.