*आज २७ जुलै* *आज पुणे रेल्वे स्थानकाचा वर्धापन दिन.देशभरातील विविध शहरांना पुण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले पुणे_रेल्वे_स्थानक आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे* पिंपरी प्रतिनिधी संदेश पगारे पुणे जिल्हा. *सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून, सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा करत स्थानक सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे* *स्थानकाचे पहिले डिझाइन १९१५ मध्ये तयार झाले. या वास्तुचे काम पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये सुरू झाले. तर, १९२५ मध्ये काम पूर्ण होऊन २७ जुलै १९२५ रोजी तत्कालिन गव्हर्नरने स्थानकाचे उद्घाटन केले* *१८५३ मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला. सध्या पुणे स्थानकातून २०० हून अधिक रेल्वेगाड्यांद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात* *व्हिक्टोरिया टर्मिनसचा विकास करीत असतानाच लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. त्या
*आज २७ जुलै*
*आज पुणे रेल्वे स्थानकाचा वर्धापन दिन.देशभरातील विविध शहरांना पुण्याशी जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा असलेले पुणे_रेल्वे_स्थानक आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे*
पिंपरी प्रतिनिधी संदेश पगारे पुणे जिल्हा.
*सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असून, सर्व प्रवाशांची अविरतपणे सेवा करत स्थानक सक्षमतेने कर्तव्य बजावत आहे*
*स्थानकाचे पहिले डिझाइन १९१५ मध्ये तयार झाले. या वास्तुचे काम पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये सुरू झाले. तर, १९२५ मध्ये काम पूर्ण होऊन २७ जुलै १९२५ रोजी तत्कालिन गव्हर्नरने स्थानकाचे उद्घाटन केले*
*१८५३ मध्ये भारतात बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. त्यानंतर काही वर्षांतच पुणे-मुंबई लोहमार्ग बांधून झाला. सध्या पुणे स्थानकातून २०० हून अधिक रेल्वेगाड्यांद्वारे लाखो प्रवासी दररोज ये-जा करतात. याशिवाय लोकलदेखील धावतात*
*व्हिक्टोरिया टर्मिनसचा विकास करीत असतानाच लंडनमधील ग्रेट इंडियन पेनीनसुला रेल्वे कंपनीने पुणे जंक्शनचा विकास केला. ब्रिटिश लष्कराच्या दृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. त्या