देहूरोड मध्ये बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्यांना अटक. पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा/देहूरोड दि. २८ जुलै २०२४ देहूरोड मध्ये बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्यांना अटक.भारतात बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्या मूळच्या म्यानमारच्या चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. देहूरोड येथील एमबी कॅम्प येथे शुक्रवारी दि.२६ जुलै २०२४ दुपारी पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. शाहिद उर्फ सुहिद्दल उर्फ स्मायली कालुस्लाम शेख ( वय ३५ वर्षे रा. एम. बी. कॅम्प देहूरोड) मुज्ञ्जमील मोहमद अमिन खान ( वय४३ वर्षे रा. गांधीनगर देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक फौजदार अशोक पेरणेकर यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित मूळचे म्यानमार देशाचे नागरिक आहेत. त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र नाहीत. त्याशिवाय भारत-म्यानमार सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांनी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. म्यानमार देशातून भारतात प्रवेश करताना रेफ्यूजी म्हणून कोणताही वैध दाखला नसताना ते २०१२ पासून देहूरोड परिसरात वास्तव्य करीत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
देहूरोड मध्ये बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्यांना अटक.
पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण
पुणे जिल्हा/देहूरोड दि. २८ जुलै २०२४ देहूरोड मध्ये बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्यांना अटक.भारतात बेकायदेशीर पणे वास्तव्य करणाऱ्या मूळच्या म्यानमारच्या चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. देहूरोड येथील एमबी कॅम्प येथे शुक्रवारी दि.२६ जुलै २०२४ दुपारी पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. शाहिद उर्फ सुहिद्दल उर्फ स्मायली कालुस्लाम शेख ( वय ३५ वर्षे रा. एम. बी. कॅम्प देहूरोड) मुज्ञ्जमील मोहमद अमिन खान ( वय४३ वर्षे रा. गांधीनगर देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक फौजदार अशोक पेरणेकर यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
संशयित मूळचे म्यानमार देशाचे नागरिक आहेत. त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र नाहीत. त्याशिवाय भारत-म्यानमार सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांनी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. म्यानमार देशातून भारतात प्रवेश करताना रेफ्यूजी म्हणून कोणताही वैध दाखला नसताना ते २०१२ पासून देहूरोड परिसरात वास्तव्य करीत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.