उद्योग उभारणीसाठी सर्वानी एकत्रित येऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी पांचाळ जाफ्राबाद प्रतिनिधी : आकाश बकाल नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण असून, प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग यासारख्या वाहतुकीच्या सुविधांसह इतर पायाभूत सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकांनी आपला उद्योग जालना जिल्ह्यात अवश्य उभारावा, यासाठी जिल्हा प्रशासन उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आज आयोजित इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जालना हा कृषीसह स्टील, बियाणे उद्योगांसाठी प्रसिध्द असून, आता हा जिल्हा रेशीम उद्योगासाठीही नावारुपाला येत आहे. एकंदरीत जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय सकारात्मक पोषक वातावरण असल्याने नवउद्योजकांसाठी उद्योग उभारणीकरीता चांगली संधी आहे. उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नव उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल, असं जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी सांगितलं. कार्यशाळेस उपस्थित छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. या कार्यशाळेस नव उद्योजकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
उद्योग उभारणीसाठी सर्वानी एकत्रित येऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी पांचाळ
जाफ्राबाद प्रतिनिधी : आकाश बकाल
नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जालना जिल्ह्यात पोषक वातावरण असून, प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग यासारख्या वाहतुकीच्या सुविधांसह इतर पायाभूत सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकांनी आपला उद्योग जालना जिल्ह्यात अवश्य उभारावा, यासाठी जिल्हा प्रशासन उद्योजकांना सर्व सहकार्य राहिल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आज आयोजित इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जालना हा कृषीसह स्टील, बियाणे उद्योगांसाठी प्रसिध्द असून, आता हा जिल्हा रेशीम उद्योगासाठीही नावारुपाला येत आहे. एकंदरीत जिल्ह्यात उद्योगासाठी अतिशय सकारात्मक पोषक वातावरण असल्याने नवउद्योजकांसाठी उद्योग उभारणीकरीता चांगली संधी आहे. उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नव उद्योजकांना प्राधान्याने लाभ दिला जाईल, असं जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी सांगितलं. कार्यशाळेस उपस्थित छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी.टी. यशवंते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली. या कार्यशाळेस नव उद्योजकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.