*जयंत पाटील साहेब पिंपरीसाठी देवेंद्र तायडेच हवेत! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडे* पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा/ पिंपरी दि ०६ ऑगस्ट २०२४ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहर कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे. पिंपरी विधानसभे संदर्भात एका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पक्षाचे शहर सरचिटणीस जयंत शिंदे म्हणाले की देवेंद्र तायडे यांच्यासारख्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेउन पुरोगामी विचार पुढे नेत असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. पक्षाचे असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले की देवेंद्र तायडे यांच्यासारख्या सर्वसामावेशक नेतृत्वामुळे पक्षाच्या वाढीला बळकटी प्राप्त होईल. यावेळी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप म्हणाले की आम्ही तायडे साहेबांच्या पाठी पाठीमागे सर्व ताकतीनिशी उभे आहोत आणि विजयश्री खेचून आणल्याशिवाय शांत बसणार नाही. पक्षाचे शहर युवक अध्यक्ष इमरान शेख यावेळी बोलताना म्हणाले की, देवेंद्र तायडे यांनी शहराच्या प्रत्येक झोपडपट्टीत काम केले आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व 30 ते 35 झोपडपट्ट्यांमध्ये देवेंद्र तायडे यांचे नाव माहित आहे. एक स्वच्छ व भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या देवेंद्रजींना पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की पक्ष बांधणीसाठी जेव्हा मी शहरात फिरते त्यावेळी देवेंद्र तायडे यांच्या शहरभरातील कार्याची प्रचिती येते. देवेंद्र तायडे हे नाव केवळ एका प्रभागापुरते नसून शहराच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचले असून अशा उमेदवाराला उमेदवारी दिल्यास ते नक्कीच पक्षाला यश मिळवून देतील असा विश्वास वाटतो. या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगताप पक्षाचे सामाजिक न्याय सेलचे प्रदेश सचिव केडी वाघमारे पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल आहेर, शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप चव्हाण, कामगार सेलचे अध्यक्ष संदीप शिंदे, ख्रिश्चन सेलचे अध्यक्ष शौल कांबळे, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड अर्बन सेल अध्यक्ष ज्योती जाधव, ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजय पिरंगुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. या बैठकीसाठी युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, उपाध्यक्ष डॉ. काशिनाथ ब्राह्मणे, सामाजिक न्याय विभागाचे आकाश शिंदे, सविता खराडे,कविता कोंडे-देशमुख,सुप्रिया कवडे, सुदाम शिंदे, धीरज तामचीकर, अजय पिल्ले, अक्षय घोडके, सुशांत खुरासने, बिरुदेव मोटे, कमलेश वाळके, गणेश भांडवलकर, रुची रमानी, सुशील घोरपडे, सुहास देशमुख, रजनीकांत गायकवाड, आदी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्तिथ सर्व पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी केली. या बैठकीचे प्रास्ताविक पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेक विधाते यांनी केले. या बैठकीत इंजि. देवेंद्र तायडे यांना पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी द्यावी असा ठराव संमत करून ते निवेदन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना दिले.
*जयंत पाटील साहेब पिंपरीसाठी देवेंद्र तायडेच हवेत! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्षांना साकडे*
पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण
पुणे जिल्हा/ पिंपरी दि ०६ ऑगस्ट २०२४ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहर कार्याध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे.
पिंपरी विधानसभे संदर्भात एका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पक्षाचे शहर सरचिटणीस जयंत शिंदे म्हणाले की देवेंद्र तायडे यांच्यासारख्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेउन पुरोगामी विचार पुढे नेत असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे.
पक्षाचे असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते म्हणाले की देवेंद्र तायडे यांच्यासारख्या सर्वसामावेशक नेतृत्वामुळे पक्षाच्या वाढीला बळकटी प्राप्त होईल.
यावेळी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप म्हणाले की आम्ही तायडे साहेबांच्या पाठी पाठीमागे सर्व ताकतीनिशी उभे आहोत आणि विजयश्री खेचून आणल्याशिवाय शांत बसणार नाही.
पक्षाचे शहर युवक अध्यक्ष इमरान शेख यावेळी बोलताना म्हणाले की, देवेंद्र तायडे यांनी शहराच्या प्रत्येक झोपडपट्टीत काम केले आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व 30 ते 35 झोपडपट्ट्यांमध्ये देवेंद्र तायडे यांचे नाव माहित आहे. एक स्वच्छ व भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या देवेंद्रजींना पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यावेळी बोलताना म्हणाले की पक्ष बांधणीसाठी जेव्हा मी शहरात फिरते त्यावेळी देवेंद्र तायडे यांच्या शहरभरातील कार्याची प्रचिती येते. देवेंद्र तायडे हे नाव केवळ एका प्रभागापुरते नसून शहराच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचले असून अशा उमेदवाराला उमेदवारी दिल्यास ते नक्कीच पक्षाला यश मिळवून देतील असा विश्वास वाटतो.
या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगताप पक्षाचे सामाजिक न्याय सेलचे प्रदेश सचिव केडी वाघमारे पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल आहेर, शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, शहर उपाध्यक्ष संदीप चव्हाण, कामगार सेलचे अध्यक्ष संदीप शिंदे, ख्रिश्चन सेलचे अध्यक्ष शौल कांबळे, शहर सरचिटणीस सचिन गायकवाड अर्बन सेल अध्यक्ष ज्योती जाधव, ग्राहक सेल अध्यक्ष संजय पडवळ, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजय पिरंगुटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. या बैठकीसाठी युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, उपाध्यक्ष डॉ. काशिनाथ ब्राह्मणे, सामाजिक न्याय विभागाचे आकाश शिंदे, सविता खराडे,कविता कोंडे-देशमुख,सुप्रिया कवडे, सुदाम शिंदे, धीरज तामचीकर, अजय पिल्ले, अक्षय घोडके, सुशांत खुरासने, बिरुदेव मोटे, कमलेश वाळके, गणेश भांडवलकर, रुची रमानी, सुशील घोरपडे, सुहास देशमुख, रजनीकांत गायकवाड, आदी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्तिथ सर्व पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी केली.
या बैठकीचे प्रास्ताविक पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विवेक विधाते यांनी केले.
या बैठकीत इंजि. देवेंद्र तायडे यांना पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी द्यावी असा ठराव संमत करून ते निवेदन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना दिले.