- सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमिताने देण्यात येणाऱ्या साहीत्य जीवनगौरव आणि कलागौरव पुरस्करांचे वितरण प्रवरा नगर येथे साहीत्य संमेलनाध्यक्ष मा.श्री.मारविंद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि *केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब* याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महसूल तथा पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी मंत्री श्री.अण्णासाहेब म्हस्के पाटील,डॉ.राजेंद्र विखे पाटील,मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील,सौ.शालिनी ताई विखे पाटील यांच्यासह सर्व पुरस्कार प्राप्त साहीत्यिक आणि कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. #Shivsena #शिवसेना #प्रवरानगर #दौरा
- ◾ राजकीय पुढाऱ्यांना लागले निवडणुकीचे वेध ; नवीन चेहरेही लागले कामाला ◾ जनसंपर्क दौऱ्याची रणधुमाळी जोरात डोंगरला 21 ऑगस्ट 🔹विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल येत्या दिवाळीच्या झग झगत्या रोशनाईत वाजणार असल्याचे राजकीय वृत्त पुढे आले आहे. आपल्याला निवडणुक लढायची आहे. यासाठी निवडणूक लढणारे राजकीय पुढारी निवडणुकीच्या पूर्व तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जनसंपर्क दौऱ्याची रणधुमाळी जोरात सुरू असुन नवीन चेहऱ्यांचीही मोर्चे बांधणी धडाक्यात सुरू आहे. 🔹 विधानसभेची निवडणूक लढणारे सर्व राजकीय पुढारी आपापल्या परीने जिल्हा परिषद क्षेत्र निहाय दौरे करून जनतेच्या थेट संपर्कात आहेत.यात माजी खासदारा पासून तर आजी माजी आमदारा सह नवीन चेहरे सुद्धा युद्ध पातळीवर सर्व जिल्हा परिषद क्षेत्र पिंजून काढत आहेत.कोण कोणत्या पक्षातून लढणार ही जरी येणारी वेळ सांगणार असली तरी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जुडवा जुडवी मात्र सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 🔹 विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा कल सर्वच राजकीय पक्षात दिसत आहे.लोकसभा निवडणुकीत झालेली युती कायम राहील की तुटेल यावर सध्या चिंतन सुरू आहे. 🔹 तुमसर मोहाडी विधान सभेसाठी माजी खासदार शिशुपाल पटले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.हरेंद्र रहांगडाले, किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले, महिला आघाडीच्या कुंदाताई वैद्य व कल्याणी ताई भुरे ह्या सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. तुमसरचे माजी नगराध्यक्ष इंजिनियर प्रदीप पडोळे हे दुसऱ्यांदा मैदानात उतरतील का ? उतरल्यास मागील निवडणुकीच्या परिणामाचा सुद्धा विचार करावा लागेल. अशीही चर्चा जोर धरत आहे. 🔹 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून विधानस भेसाठी नवीन चेहरा म्हणून भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश पारधी यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे.रमेश पारधी हे नानाभाऊ पटोले यांचे खंदे समर्थक व लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अ. कलाम शेख यांचेही नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडुन विद्यमान आ. राजू कारेमोरे व माजी शिक्षण सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर तालुका अध्यक्ष धनेंद्र तुरकर यांचे नावाची चर्चा चांगलीच जोर धरत आहे. 🔹पंचायत समिती तुमसरचे उपसभापती हिरालाल नागपुरे. ठाकचंद मुंगूसमारे माजी आमदार अनिल बावनकर, चरण वाघमारे व किरण अतकरी हे सुद्धा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त पुढे आले आहे. परंतु कोण कोणत्या पक्षातून लढणार हे तर येणारी वेळ सांगणार असली तरी यावेळी तुमसर मोहाळी विधानसभेची निवडणूक मात्र चांगलीच रंगतदार ठरणार आहे.