निषेध रॅली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारुती कोडापे जाहीर आव्हान बुडती हे जन… जाहीर आव्हान ना देखवे डोळा.. म्हनूनी कळवळा येत असे…… डोंगरदऱ्यात, अतिशय दुर्गम भागात पिचत पडलेल्या समाजाला पेनचे (शिक्षणाचे महत्व) समजून देणे हा गुन्हा आहे काय ? तळागाळातील लोकांना संविधान साक्षर करणे हा गुन्हा आहे काय? डोंगरदऱ्यात इतरत्र भटकत्या समाजाला सामाजिक सलोखा म्हणून एकत्र आणणे व त्यांच्यात आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक गरजाविषयी जागृती निर्माण करणे हा गुन्हा आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व उच्चशिक्षित होऊन आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे सारख्या समाजभान ठेवून निद्रावस्थेत असलेल्या समाजाला आपल्या कृतीने जागे करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय का? ज्या समाजाच्या नावावर आम्ही दोन घास खायला लागलो, त्या समाजाच्या व्यथा समजून त्यांना वैचारिक मदत करू शकत नसेल तर आम्ही चार पुस्तके शिकण्याला अर्थ काय ? पुस्तक वाचल्याने माणसाचे मस्तक सशक्त होते, सशक्त मस्तक कोणाचे हस्तक बनत नाही, व कोणासमोर नतमस्तकही होत नाही. कोरोनासारख्या जागतिक महामारीत आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योद्धयाची उत्कृष्ठ भूमिका निभावणारा व कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करताना घरातील एक डॉक्टर देशाला अर्पण करणारा व्यक्ती आज वाईट कसा? सूर्याला आपला स्वतःचा परिचय द्यायची गरजच नाही. सूर्याचा प्रकाशच त्याचा आपोआप परिचय देतो. डॉ. प्रवीण येरमे यांच्या सेवेची दखल घेऊन एकेकाळी आपल्याच व्यवस्थेने त्यांना कोरपना भूषण पुरस्कार देऊन पाठ थोपटली होती मग तो व्यक्ती आज वाईट कसा? इमाने इतबारे आपले शासकीय कर्तव्य पूर्ण करून उर्वरित वेळेत स्वखर्चातून प्रचंड बजेट असणारे मिशन ग्रॅज्युएट, मिशन पोस्ट ग्रॅज्युएट, मिशन पी.एच.डी., संविधान जागृती, संविधानाच्या १००० प्रतीचे मोफत वितरण, समाजव्यवस्था व संस्कृती टिकवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गाव पाटलाचा सन्मान, गावपाडे, तांडे, गुडे यावर जाऊन आरोग्य विषयक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती, गरोदर माता जनजागृती, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, नवजात बालकांच्या जन्माचे स्वागत म्हणून बोधिवृक्ष (पिंपळ वृक्ष) तसेच वडाचे वृक्ष देऊन मातांचे स्वागत असे अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गरिबाचा मार्गदर्शक म्हणून पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे यांच्या सामाजिक कार्याला शेवटी दृष्ट लागलीच. हा समाज सुधारला तर आमच्या सतरंज्या कोण उचलणार? ही नीच प्रवृत्तीची मानसिकता असणारी राजकीय शक्ती व त्या राजकीय शक्तीला रसद पुरविण्यारे समाजातील काही दलाल सक्रिय झाले व मागील एक वर्षापासून समाजसेवा, समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाच्या लढाईत काटे फैलविण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे रुग्णालयातील सहकारी, रुग्णालयातील शासकीय कर्मचारी, उपचार घेणारे रुग्ण किंवा इतरत्र विभागीय चौकशी नसताना रातोरात अचानक ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे बदली झाल्याचा आदेश धडकतो. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पहिलेच अनेक पदे रिक्त असताना व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आधीच पाच डॉक्टर कार्यरत असताना या ठिकाणी बदलीने अतिरिक्त डॉक्टर देण्याची गरज काय ? नक्कीच यामागे खूप मोठे राजकीय कटकारस्थान आहे. विकृत मानसिकतेची प्रवृत्ती कार्यरत आहे हे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारचे ठोस कारण नसताना गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे यांना हाकलण्याचे कारण काय ? बदलीसाठी कोणाचा राजकीय दबाव होता? राजकीय ताकद वापरून प्रशासनावर दबाव आणणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? आपल्या बहुजन स समाजाने सारे दिवस यांच्या सतरंज्या उचलाव्या हे दिपास्वप्न पाहणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? यांचा जाब विचारण्यासाठी तळागाळातील बहुजन जनतेने होणाऱ्या निषेध रॅलीत प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे. * स्थळ : गडचांदूर ता. कोरपना जिल्हा : चंद्रपूर * दिनांक : ५ सप्टेंबर २०२४ गुरुवार वेळ : दुपारी १२.०० वाजता भव्य निषेध रॅलीचा मार्ग क्रांतिकारी बाबुराव शेडमाके चौक ते संविधान चौक ते जननायक बिरसा मुंडा चौक ते राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सभेत रूपांतर व निवेदन देणे. * आपले विनीत आयोजक समस्त बहुजन समाज राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती
निषेध रॅली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मारुती कोडापे जाहीर आव्हान
बुडती हे जन…
जाहीर आव्हान
ना देखवे डोळा..
म्हनूनी कळवळा येत असे…… डोंगरदऱ्यात, अतिशय दुर्गम भागात पिचत पडलेल्या समाजाला पेनचे (शिक्षणाचे महत्व) समजून देणे हा गुन्हा आहे काय ? तळागाळातील लोकांना संविधान साक्षर करणे हा गुन्हा आहे काय? डोंगरदऱ्यात इतरत्र भटकत्या समाजाला सामाजिक सलोखा म्हणून एकत्र आणणे व त्यांच्यात आरोग्य, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक गरजाविषयी जागृती निर्माण करणे हा गुन्हा आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व उच्चशिक्षित होऊन आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे सारख्या समाजभान ठेवून निद्रावस्थेत असलेल्या समाजाला आपल्या कृतीने जागे करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय का? ज्या समाजाच्या नावावर आम्ही दोन घास खायला लागलो, त्या समाजाच्या व्यथा समजून त्यांना वैचारिक मदत करू शकत नसेल तर आम्ही चार पुस्तके शिकण्याला अर्थ काय ? पुस्तक वाचल्याने माणसाचे मस्तक सशक्त होते, सशक्त मस्तक कोणाचे हस्तक बनत नाही, व कोणासमोर नतमस्तकही होत नाही. कोरोनासारख्या जागतिक महामारीत आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना योद्धयाची उत्कृष्ठ भूमिका निभावणारा व कोरोनासारख्या महामारीत रुग्णसेवा करताना घरातील एक डॉक्टर देशाला अर्पण करणारा व्यक्ती आज वाईट कसा? सूर्याला आपला स्वतःचा परिचय द्यायची गरजच नाही. सूर्याचा प्रकाशच त्याचा आपोआप परिचय देतो. डॉ. प्रवीण येरमे यांच्या सेवेची दखल घेऊन एकेकाळी आपल्याच व्यवस्थेने त्यांना कोरपना भूषण पुरस्कार देऊन पाठ थोपटली होती मग तो व्यक्ती आज वाईट कसा? इमाने इतबारे आपले शासकीय कर्तव्य पूर्ण करून उर्वरित वेळेत स्वखर्चातून प्रचंड बजेट असणारे मिशन ग्रॅज्युएट, मिशन पोस्ट ग्रॅज्युएट, मिशन पी.एच.डी., संविधान जागृती, संविधानाच्या १००० प्रतीचे मोफत वितरण, समाजव्यवस्था व संस्कृती टिकवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या गाव पाटलाचा सन्मान, गावपाडे, तांडे, गुडे यावर जाऊन आरोग्य विषयक जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांची निर्मिती, गरोदर माता जनजागृती, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, नवजात बालकांच्या जन्माचे स्वागत म्हणून बोधिवृक्ष (पिंपळ वृक्ष) तसेच वडाचे वृक्ष देऊन मातांचे स्वागत असे अनेकानेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गरिबाचा मार्गदर्शक म्हणून पुढे आलेल्या डॉ. प्रवीण येरमे यांच्या सामाजिक कार्याला शेवटी दृष्ट लागलीच. हा समाज सुधारला तर आमच्या सतरंज्या कोण उचलणार? ही नीच प्रवृत्तीची मानसिकता असणारी राजकीय शक्ती व त्या राजकीय शक्तीला रसद पुरविण्यारे समाजातील काही दलाल सक्रिय झाले व मागील एक वर्षापासून समाजसेवा, समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाच्या लढाईत काटे फैलविण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे रुग्णालयातील सहकारी, रुग्णालयातील शासकीय कर्मचारी, उपचार घेणारे रुग्ण किंवा इतरत्र विभागीय चौकशी नसताना रातोरात अचानक ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे बदली झाल्याचा आदेश धडकतो. गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पहिलेच अनेक पदे रिक्त असताना व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे आधीच पाच डॉक्टर कार्यरत असताना या ठिकाणी बदलीने अतिरिक्त डॉक्टर देण्याची गरज काय ? नक्कीच यामागे खूप मोठे राजकीय कटकारस्थान आहे. विकृत मानसिकतेची प्रवृत्ती कार्यरत आहे हे स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारचे ठोस कारण नसताना गडचांदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे यांना हाकलण्याचे कारण काय ? बदलीसाठी कोणाचा राजकीय दबाव होता? राजकीय ताकद वापरून प्रशासनावर दबाव आणणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? आपल्या बहुजन स समाजाने सारे दिवस यांच्या सतरंज्या उचलाव्या हे दिपास्वप्न पाहणारा तो राजकीय समाजकंटक कोण ? यांचा जाब विचारण्यासाठी तळागाळातील बहुजन जनतेने होणाऱ्या निषेध रॅलीत प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे.
* स्थळ : गडचांदूर ता. कोरपना जिल्हा : चंद्रपूर * दिनांक : ५ सप्टेंबर २०२४ गुरुवार वेळ : दुपारी १२.०० वाजता
भव्य निषेध रॅलीचा मार्ग
क्रांतिकारी बाबुराव शेडमाके चौक ते संविधान चौक ते जननायक बिरसा मुंडा चौक ते
राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते
ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सभेत रूपांतर व निवेदन देणे.
* आपले विनीत आयोजक
समस्त बहुजन समाज राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, जिवती