*शेतकरी कृती समितीच्या वतीने दि ६ सप्टेंबर २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय समोर फटाके फोडो आंदोलन करण्यात आले* आज दि ७ सप्टेंबर रोजी गंगापुर तहसील कार्यालय येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने फटाके फोडुन दि २७ आॅगस्ट २०२४ रोजी तहसीलदार गंगापुर यांना गंगापुर तालुक्यातील शेतकर् याच्या मागण्या बाबत निवेदन दिले होते. परंतु तब्बल ८ दिवस झाले तरी झोपलेल्या तहसील प्रशासनाने कोणती कार्यवाही केली कळवले नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी दि ६ सप्टेंबर २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता फटाके फोडो आंदोलन करण्यात येणार आहे. *प्रमुख मागण्या* १) गंगापुर तालुक्यातील सर्व मंडळाचा जुन ते आज पर्यंत महावेध पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा. २) ज्या मंडळात जुन ते आज पर्यंत २४ तासात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असे त्या मंडळाच्या नुकसानीचा अहवाल नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा. ३) डोणगाव मंडळाचे स्वयंचलित पर्जन्यमान यंञ सदोष असल्याने ते स्थालांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन तहसील यांनी घेतला होता. परंतु आज पर्यंत स्थलांतर न झाल्याने त्याद्वारे मोजमाप झालेले पर्जन्यमान योग्य नसल्याने,डोणगाव मंडळात अनेक गावात,शेतात पाणी साचल्याने अतिवृष्टी झाल्याचे निष्पन्न होत आहे.त्यामुळे डोणगाव मंडळाचा अतिवृष्टी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा. ४) नव्याने पुनर्रचना झालेल्या जामगाव, आसेगाव व गाजगाव मंडळात पर्जन्यमान यंञ बसवण्यात आलेली नाहीत.त्या मंडळात इतर अतिवृष्टी झालेल्या मंडळा प्रमाणे नुकसानीचा अहवाल पाठवण्यात यावा. ५) ज्या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे (डोणगाव मंडळासह)अशा मंडळात पिकविमा धारक शेतकर्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासाठीचा अहवाल चोलामंडलम कृषी विमा कंपनीला देण्यात यावा. ६) जायकवाडी फुगवट्याचे व पुराचे पाणी अ संपादित जमिनीत साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून शेतकर्यांनी मागणी केल्या प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. ७) रब्बी २०२३-२४ बाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते,परंतु आज पर्यंत कोणत्याही निर्णय न झाल्याने रब्बी २०२३-२४ पिकविमा मंजुर झाला कि नाही,झाला असेल तर लाभार्थी यादी देण्यात यावी. ८) खरिप २०२३-२४ पिकविमा मंजूर झाला होता, तो वाटप ही झाला परंतु आज पर्यंत शेतकर्यांची मंडळ निहाय यादी चोलामंडलम कृषी विमा कंपनीने दिलेली नाही ती देण्यात यावी. ९) अतिवृष्टी पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टिम मध्ये असलेले तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नेमनुकीच्या जागेवर राहण्याची सक्ती करण्यात यावी.जेणेकरून नैसर्गिक आपत्ती च्या काळात लवकरात लवकर मदत पोहच होईल.जर संबंधित अधिकारी आदेशाचे पालन करत नसतील त्याची तालुक्या बाहेर बदली करण्यासाठी शिफारस करावी. १०) खरिप हंगाम सुरू असल्याने शेतकर्यांच्या offline तक्रारी कृषी सहाय्यक,तलाठी व ग्रामसेवक यांना स्वीकारून पोच देण्यासाठी आदेशीत करावे. असे निवेदन इंजी. महेशभाई गुजर राहुल ढोले आण्णासाहेब जाधव राहुल सुरासे, विनोद काळे, मुस्ताक पटेल,किशोर परभने, मंगेश भनगे ,विजय निरफळ,विक्रम पंडीत समद भाई पठाण, राधेशाम कोल्हे, ज्ञानेश्वर सुरासे, राजेश शेळके बापु शेळके यांच्या सह शेकडो उपस्थित होते
*शेतकरी कृती समितीच्या वतीने दि ६ सप्टेंबर २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय समोर फटाके फोडो आंदोलन करण्यात आले*
आज दि ७ सप्टेंबर रोजी गंगापुर तहसील कार्यालय येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने फटाके फोडुन
दि २७ आॅगस्ट २०२४ रोजी तहसीलदार गंगापुर यांना गंगापुर तालुक्यातील शेतकर् याच्या मागण्या बाबत निवेदन दिले होते. परंतु तब्बल ८ दिवस झाले तरी झोपलेल्या तहसील प्रशासनाने कोणती कार्यवाही केली कळवले नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी दि ६ सप्टेंबर २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता फटाके फोडो आंदोलन करण्यात येणार आहे.
*प्रमुख मागण्या*
१) गंगापुर तालुक्यातील सर्व मंडळाचा जुन ते आज पर्यंत महावेध पर्जन्यमान अहवाल सार्वजनिक करावा.
२) ज्या मंडळात जुन ते आज पर्यंत २४ तासात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असे त्या मंडळाच्या नुकसानीचा अहवाल नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा.
३) डोणगाव मंडळाचे स्वयंचलित पर्जन्यमान यंञ सदोष असल्याने ते स्थालांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन तहसील यांनी घेतला होता. परंतु आज पर्यंत स्थलांतर न झाल्याने त्याद्वारे मोजमाप झालेले पर्जन्यमान योग्य नसल्याने,डोणगाव मंडळात अनेक गावात,शेतात पाणी साचल्याने अतिवृष्टी झाल्याचे निष्पन्न होत आहे.त्यामुळे डोणगाव मंडळाचा अतिवृष्टी झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा.
४) नव्याने पुनर्रचना झालेल्या जामगाव, आसेगाव व गाजगाव मंडळात पर्जन्यमान यंञ बसवण्यात आलेली नाहीत.त्या मंडळात इतर अतिवृष्टी झालेल्या मंडळा प्रमाणे नुकसानीचा अहवाल पाठवण्यात यावा.
५) ज्या मंडळात अतिवृष्टी झालेली आहे (डोणगाव मंडळासह)अशा मंडळात पिकविमा धारक शेतकर्यांना २५ टक्के अग्रीम देण्यासाठीचा अहवाल चोलामंडलम कृषी विमा कंपनीला देण्यात यावा.
६) जायकवाडी फुगवट्याचे व पुराचे पाणी अ संपादित जमिनीत साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.त्यांचे स्वतंत्र पंचनामे करून शेतकर्यांनी मागणी केल्या प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी.
७) रब्बी २०२३-२४ बाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते,परंतु आज पर्यंत कोणत्याही निर्णय न झाल्याने रब्बी २०२३-२४ पिकविमा मंजुर झाला कि नाही,झाला असेल तर लाभार्थी यादी देण्यात यावी.
८) खरिप २०२३-२४ पिकविमा मंजूर झाला होता, तो वाटप ही झाला परंतु आज पर्यंत शेतकर्यांची मंडळ निहाय यादी चोलामंडलम कृषी विमा कंपनीने दिलेली नाही ती देण्यात यावी.
९) अतिवृष्टी पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टिम मध्ये असलेले तलाठी,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना नेमनुकीच्या जागेवर राहण्याची सक्ती करण्यात यावी.जेणेकरून नैसर्गिक आपत्ती च्या काळात लवकरात लवकर मदत पोहच होईल.जर संबंधित अधिकारी आदेशाचे पालन करत नसतील त्याची तालुक्या बाहेर बदली करण्यासाठी शिफारस करावी.
१०) खरिप हंगाम सुरू असल्याने शेतकर्यांच्या offline तक्रारी कृषी सहाय्यक,तलाठी व ग्रामसेवक यांना स्वीकारून पोच देण्यासाठी आदेशीत
करावे.
असे निवेदन इंजी. महेशभाई गुजर
राहुल ढोले
आण्णासाहेब जाधव राहुल सुरासे, विनोद काळे, मुस्ताक पटेल,किशोर परभने,
मंगेश भनगे ,विजय निरफळ,विक्रम पंडीत
समद भाई पठाण,
राधेशाम कोल्हे,
ज्ञानेश्वर सुरासे,
राजेश शेळके
बापु शेळके
यांच्या सह शेकडो उपस्थित होते