गणेश महोत्सवाची उत्साहात सांगता पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा / विकास नगर किवळे दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी जागृत मित्र मंडळ समर्थ कॉलनी विकास नगर किवळे येथे गणेश महोत्सवाची उत्साहात सांगता करण्यात आली दहा दिवस विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमातून गौरविण्यात आले. मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्यनारायण पूजेला बसण्याचा मान श्री तुषार जाधव आणि सौ प्रियंका जाधव यांना मिळाला. यावेळेस महाप्रसादाचे नियोजन श्री संदीप देवाडीगा शिल्ड ग्रुप यांच्याकडून करण्यात आले. विविध स्पर्धेमधील सहभागी स्पर्धांना बक्षीस वितरण समारंभातून गौरविण्यात आले यावेळी विजेता स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला मंडळाचे रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी ॲड. अश्विनी विश्वास डोके व जागृत मित्र मंडळाच्या कार्यक्रमांची प्रसिद्धी केल्याबद्दल महाराष्ट्र लोक न्यूज चैनल चे माध्यम प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली
गणेश महोत्सवाची उत्साहात सांगता
पुणे जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण
पुणे जिल्हा / विकास नगर किवळे दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी जागृत मित्र मंडळ समर्थ कॉलनी विकास नगर किवळे येथे गणेश महोत्सवाची उत्साहात सांगता करण्यात आली दहा दिवस विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमातून गौरविण्यात आले.
मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्यनारायण पूजेला बसण्याचा मान श्री तुषार जाधव आणि सौ प्रियंका जाधव यांना मिळाला. यावेळेस महाप्रसादाचे नियोजन श्री संदीप देवाडीगा शिल्ड ग्रुप यांच्याकडून करण्यात आले.
विविध स्पर्धेमधील सहभागी स्पर्धांना बक्षीस वितरण समारंभातून गौरविण्यात आले यावेळी विजेता स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला मंडळाचे रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी ॲड. अश्विनी विश्वास डोके व जागृत मित्र मंडळाच्या कार्यक्रमांची प्रसिद्धी केल्याबद्दल महाराष्ट्र लोक न्यूज चैनल चे माध्यम प्रतिनिधी अभिजीत सिद्धार्थ चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली