राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांची ekyc करणेची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ekyc करणे आवश्यक आहे या पैकी २.३० लाख खातेदार यांनी दिनांक २५.९.२०२४ अखेर ekyc पूर्ण केले आहे ख़्वारीत शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. १. ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे. त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील. २. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात.तरी शेतक-यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.जा.क्र. विप्र-३/कापूस व सोयाबीन/आ.स/२०२४/२-२६७कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००५दिनांक : २५.०९.२०२४प्रति,कृषि उपसंचालक (माहिती विभाग)कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांची ekyc करणेची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ekyc करणे आवश्यक आहे या पैकी २.३० लाख खातेदार यांनी दिनांक २५.९.२०२४ अखेर ekyc पूर्ण केले आहे ख़्वारीत शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
१. ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे. त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील.

Advertisement

२. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात.तरी शेतक-यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.जा.क्र. विप्र-३/कापूस व सोयाबीन/आ.स/२०२४/२-२६७कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००५दिनांक : २५.०९.२०२४प्रति,कृषि उपसंचालक (माहिती विभाग)कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!