ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन


महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल विदर्भ प्रतिनिधी चेतन हिंगे.

दर्यापूर : महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत सांगणक परिचालक संघटनेच्या वतीने आपल्या शासन स्तरावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून आंदोलनाचा तिसरा टप्पा हा संघटनेच्या वतीने राज्यातील मा.आ.बळवंतजी वानखडे यांच्या निवासस्थाना समोर एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कार्यरत संगणक परीचालकांच्या मागील १२ वर्षापासून मागण्या प्रलंबित असून मागील वर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी लेखी आश्वासन तसेच वारंवार संघटनेच्या वतीने मंत्रीमहोदय यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांसाठी कोणताही तोडगा न निघाल्याने तसेच शासनाकडून केवळ वेळकाढूपणा करत असल्याने संगणक परीचालकांमध्ये असंतोषाची लाट पसरली असून त्याचा परिपाक म्हणजे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेले आहे.

Advertisement

ग्रामविकास विभागाने माजी सनदी अधिकारी श्री.अभय यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतिबंधामध्ये क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची शिफारस असून या पदावर सरसकट नियुक्ती करावी व दर महिन्याच्या निश्चित तारखेस वेतन द्यावे, आकृतिबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान २०,०००/- रुपये मासिक वेतन देण्यात यावे, नियमबाह्य कामे लावताना ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा मोबदला वेगळा देण्यात यावा, सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत असलेले दिलेली टार्गेट सिस्टीम बंद करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आज मा.आ.बळवंतजी वानखडे यांच्या निवासस्थानी दर्यापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन अंजनगाव सुर्जी व दर्यापूर मतदार संघातील येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत संगणक परिचालक यांनी एकदिवसीय धरणे आंदोलनात सहभाग घेतला. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच अंजनगाव सुर्जी येथील अध्यक्ष श्री.सतीश सदार, उपाध्यक्ष श्री.अमित कुकडे, तालुक्का कार्याध्यक्ष श्री.श्रीकांत मुर्हेकर, सचिव श्री.योगेश नाथे, तालुक्का सह सचिव लुकेश राऊत, कोषाध्यक्ष श्री.शाम काळमेघ, तालुक्का संपर्क प्रमुख श्री.वैभव ओलंबे, संघटक श्री.पपेश पाठक, मार्गदर्शक सौ.जायला मॅडम आणि व इतर यांनी मेहनत घेतली.


Mharastralok News

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मुख्य संपादक गजानन देठे साहेब छत्रपती संभाजीनगर मो. 9765121365 प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे त्वरित संपर्क साधावा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा 9765121365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!