खानापूर ग्रामपंचायतकडून शाळा ,अंगणवाडीला विविध साहित्य भेट
महाराष्ट्र न्यूज चॅनेल टेंभुर्णी प्रतिनिधी (दत्ता देशमुख याज कडून )
खानापूर -वरखेडा गट ग्रामपंचायत च्या वतीने खानापूर जिल्हा परिषद शाळा,वरखेडा फिरंगी येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयास प्रत्येकी 1 झेरॉक्स मशीन, 1 ऑफिस टेबल, 1 व्हील चेअर, एक घड्याळ, कचराकुंड्या तर अंगणवाडीला धान्य साठवण्यासाठी कोठ्या भेट देण्यात आल्या.ग्रामपंचायत कार्यालयासाठी एक इन्व्हर्टर-बॅटरी,एक कचरा सायकल गाडी व वरखेडा शाळेला एक ऑफिस कपाट ही देण्यात आले.यावेळी सरपंच प्रतिनिधी निवृत्ती जाधव,उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके ,ग्रामसेविका श्रीमती काळपांडे, ग्राम संसद सदस्य गजानन तायड़े, ऋषिन्द्र शेळके,
लक्ष्मण शिंदे, केंद्रप्रमुख सुधाकर चिंधोटे, चंदू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना निवृत्ती जाधव म्हणाले कि आगामी काळात ही ग्रामपंचायत च्या वित्त आयोग व विविध योजनेच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. यावेळी बोलताना केंद्रप्रमुख श्री चिंधोटे म्हणाले कि वित्त आयोगाच्या माध्यमातून सर्वच ग्रामपंचायतीनी खानपुर ग्रामपंचायत चा आदर्श घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी तरतूद असलेला निधी उपलब्ध करून द्यावा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद यांनी केले.खानापुर शाळेसाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायत चे आभार मानले.यावेळी दिनेश डोईफोडे, शारदा कायंदे,श्रीपाद देशपांडे, गजानन शेळके,भागवत चव्हाण, कृष्णा तायडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.